चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रकरणात एसडीओंनी दिले तहसीलदारांना चौकशीचे आदेश

0
657
व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना उध्दट वागणुक देऊन हमीभावापेक्षा कमी दरात माल खरेदी 
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
    चांदूर रेल्वे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देऊन शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करून लूट करीत असल्याची तक्रार बासलापुर येथील शेतकऱ्याने स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना दिली होती. या प्रकरणावर उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक यांनी तहसीलदार आर. एस. इंगळे यांना चौकशीचे आदेश दिले आहे.
      चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापुर येथील शेतकरी अमोल अवधूतराव आखरे यांनी शेतातील तूर चांदुर रेल्वे येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणली असता व्यापारी वर्गाने बोली बोलते वेळी हमीभावापेक्षा कमी किंमतीत मालाची बोली लावली होती. तेव्हा अमोल आखरे यांनी सरकारी हमीभाव ५६७५ रूपये असून सुद्धा यापेक्षा कमी दरात खरेदी करीत असल्याचे व्यापाऱ्याला विचारणा केली असता सदर व्यापाऱ्याने तुमच्याकडून जे करायचे असेल ते करा असे उध्दटपणे बोलल्याचा आरोप अमोल आखरे यांनी केला हो़ता. याबाबत शेतकरी अमोल आखरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना तक्रार दिली होती. सदर प्रकरणावर तहसीलदारांनी स्वत: विनाविलंब तत्काळ चौकशी करून उलटटपाली अहवाल आपल्या कार्यालयात सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहे. त्यामुळे तहसीलदारांमार्फत नि:पक्ष चौकशी होऊन सदर सत्य बाहेर येणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बाजार समिती सभापतींचे ते स्टेटमेंट खोटे – शेतकरी अमोल आखरे

      शासनाने ठरविलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केल्यास अशा प्रकरणात कारवाई करण्यांचे कोणतेही अधिकार कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले नाही असे बाजार समिती सभापती यांनी काही वृत्तपत्रांना दिलेल्या प्रतीक्रियेतुन म्हटले होते. परंतु नुकतेच पणण व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अशा व्यापाऱ्यांवर थेट बाजार समितीला कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे सभापतींचे ते स्टेटमेंट खोटे आहे असे शेतकरी अमोल आखरे यांनी म्हटले. तसेच नाफेडमध्ये मी माझी तुर विकु शकत नाही. कारण संत्र्याच्या बागेतील उरलेल्या जागेवर मी तुर लावल्यामुळे पटवारी यांच्याकडून मला पेरेपत्रक मिळू शकत नसल्याचेही आखरेंनी सांगितले.