भोला व युध्दवीरच्या लढतीने तालुकावासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले – पुरूष खुल्या गटात कोल्हापुरचा गुलाब आगरकर विजयी

253
जाहिरात
Slider

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 

रविवारी रात्री उशीरा झालेल्या दिल्ली येथील हिंद केसरी प्रविण भोला व हरियाणा येथील हिंद केसरी युध्दवीर सिंग यांच्या लढतीने तालुकावासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तर ८५ किलो वजनावरील खुल्या गटात कोल्हापुरचा गुलाब आगरकर हा अजिंक्य ठरला व त्याला गदा भेट देण्यात आल्या.

     चांदूर रेल्वे येथील जय हिंद क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धा विविध गटात आयोजित करण्यात आली होती. रविवारी पार पडलेल्या सामन्यांमध्ये अनेक सामने खेळविले गेले. ६५ किलो पुरूष गटात अमरावती येथील अनुज सारवान प्रथम तर मालेगांव येथील सद्दाम खान हा व्दितीय, ७० किलो पुरूष गटात प्रथम पुणे येथील बाळू बिन्नर व व्दितीय अमरावती येथील अजय पखमोडे, ७५ किलो पुरूष गटात प्रथम अहमदनगर येथील अनिल गायकवाड व व्दितीय अमरावती येथील दानिश खान, ८५ किलो पुरूष गटात प्रथम अमरावती येथील अब्दुल शोएब व व्दितीय कोल्हापुर येथील प्रदिप बेंद्रे व ८५ किलोवरील खुल्या पुरूष गटात प्रथम गुलाब आगरकर व व्दितीय पुणे येथील केवल भिंगारे यांनी पटकाविला. आयोजक निलेश विश्वकर्मा, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जावेदभाई, नांदगाव खंडेश्वर येथील नगराध्यक्ष संजय पोफळे, विजय उगले, प्रविण हरमकर, डॉ. रत्न बारखे, सलीम बेग, मानसिंग यादव, रोहीत पाल, दिपक डहाणे, प्रकाश मारोडकर, नगरसेवक अजय हजारे, बच्चु वानरे आदींच्या हस्ते विजयी पहिलवानांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन प्रविण मोहोड यांनी केले. सदर स्पर्धा डॉ. संजय तिरथकर यांच्या मदतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमासाठी निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात जय हिंद क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. सर्वात शेवटी दिल्ली येथील प्रवीण भोला व हरियाणा येथील युध्दवीर या दोन हिंद केसरी पहिलवानात लढत झाली. यामध्ये प्रवीण भोलाने आपल्या चपळ शैलीत बलाढ्य युध्दवीरला पराजीत केले. ही लढत जवळपास अर्धा तास चालली. या पहिलवानांनी चांदूर रेल्वेत लढतीसाठी प्रत्येकी दोन – दोन लाख रूपये घेतल्याचे समजते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।