*डॉ मंगेश चव्हाण यांची आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रासाठी निवड : भारत सरकार आयुष्य मंत्रालय तर्फे हँडसओन

0
678

भारत सरकार आयुष मंत्रालय तर्फे आयोजित केलेल्या अंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेण्यासाठी डॉ मंगेश चव्हाण(कडेगाव) यांची निवड झाली आहे. या ठिकाणी देश विदेशातून डॉक्टर्स येणार आहेत. सेंट्रल आयुष मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित राहणार आहेत. या उपस्थित मान्यवारांसमोर डॉ मंगेश चव्हाण हँडसओन प्रेसेंट करणार आहेत २५ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात हे हँडसऑन होईल. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याला भूषण होईल, असे अभिमानास्पद काम डॉ. चव्हाण यांनी केलेले आहे.डॉक्टरांनी आयुर्वेद क्षेत्रात पदवी घेऊन ते पुणे, मुंबई वगैरे बाहेर न जाता आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडतायत. व या आपल्या तालुक्यात लोकांना सेवा देतायत. मणक्याच्या आजारा संदर्भात त्यांनी खुप मोलाचे काम केले आहे. परीसारतील व बाहेरील असंख्य रुग्ण त्यांनी बरे केलेले आहेत. त्यांनी राजस्थान, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट शासन (एमसीआयएम) यांनी कॉन्फरस मध्ये त्यांना पुरस्कार देऊन गौरवन्यात आले आहे. महाराष्ट्रातून डॉ. चव्हाण, डॉ. नवले व डॉ. मकवाना हे रवाना होत आहेत.