*महाड ते मुंबई मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हा – विकास माने

0
675

मुख्यमंत्र्यांकडे धनगर आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला फक्त आश्वासनाचे गाजर दाखविल्यामुळे दि 27 रोजी महाड ते मुंबई असा पायी मोर्चा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार असल्याने या मोर्चात कडेगांव तालुक्यातील हजारो धनगर समाज बांधवांनी सामिल होण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते विकास माने यांनी केले.धनगर आरक्षणाबाबत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा (टिस) अहवाल राज्य सरकारला मिळाला असुन त्यांची छाननी सुरू असुन आचारसंहिता पुर्वीच धनगर आरक्षणाची शिफारस केंद्राकडे करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले . धनगर आरक्षणाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विचारणा केली असता सदर अहवालाची कार्यवाही आचारसंहिता लागण्याच्या पुर्वी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.धनगर समाजाला शिफारशी ची गरज नसुन धनगर समाजाला एसटी जमातीचे सर्टीफिकेट हातात ध्यावे या मागणीकडे मात्र सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले केल्याने धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महाड ते मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी सामिल होण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते विकास माने यांनी केले आहे.