★ सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात नेर्ली येथे भास्कर लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न★

0
743

काल कालकथित भास्कर पूनाप्पा लोंढे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त कडुताई खरात यांचा स्वरांजली व पुरस्कार प्रदान कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील नेर्ली तालुका कडेगांव येथे नुकताच पार पडला. सुरुवातीला प्रतिमापूजन झाल्यानंतर स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक चेतन सावंत यांनी केले. ज्यांच्या सुमधुर आवाजाने महाराष्ट्राला वेड लावले त्या कडुताईच्या गोड आवाजाने उपस्थितांची मने भारावून गेली.त्यानंतर,भास्कर लोंढे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पुरस्कार कडुताई यांच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर मनोगतात म्हणाले की,कडुताई खरात यांचा नाव जरी कडुताई असलं तरी त्यांच्या आवाजात पराकोटीचा गोडवा आहे.कडूताईना येत्या काळात घर उभं करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात शरद भाऊ लाड म्हणाले की,असे पुण्यस्मरणाचे कार्यक्रम गावोगावी व्हायला हवेत.स्मृतींदिनानिमित्त असे प्रबोधनाची परंपरा जोपासणारे कार्यक्रम होतायत याचा मला अभिमान वाटला.भविष्यात चेतन सावंत राबवित असलेल्या उपक्रमांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.दत्तकुमार खंडागळे,पंचायत समिती सदस्या मंगलाताई क्षीरसागर,माजी सरपंच सुनील पाटील,भारिप जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, बसपा जिल्हा सचिव शिवलिंग सोनवणे,संतोष माने हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले.तर आभार नितीन चंदनशिवे यांनी मांडले.