*पुरोगामी शिक्षक समितीचे उद्या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन-प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित*

0
831

चंद्रपूर- जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करण्यात आल्या, निवेदने दिली मात्र समस्या सुटायच्या ऐवजी वाढतच चालल्या आहेत करिता शिक्षकांच्या न्याय मागण्यांना वाचा फोडण्यासाठी शनिवार 2 मार्च 2019 ला दुपारी 12 ते 5 या वेळेत जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक धरने आंदोलन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.

संघटनेच्या पाठपुराव्यानंतर घेण्यात येणाऱ्या समस्या निवारण सभेत फ़क्त आश्वासन दिले जाते पण कार्यपूर्ति केली जात नाही.
करिता प्रलम्बित समस्या निवारणार्थ शनिवार दिनांक 2 मार्च 2019 रोज शनिवार ला संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर लोकशाही मार्गाने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आन्दोलन करण्यात येत आहे. आणि याउपरही प्रलंबित समस्या न सुटल्यास दिनांक 11 मार्च पासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. प्रलम्बित समस्या पुढीलप्रमाणे आहेत.
वरिष्ट वेतन श्रेणी मंजूर यादी तात्काळ प्रकाशित करून वेतन निश्चिती करावी, नुकत्याच झालेल्या अतिरिक्त मु.अ. समायोजनातिल सदोष समायोजन तात्काळ दूर करून नव्याने समायोजन करण्यात यावे, 2/8/2006 च्या gr चा चुकीचा अर्थ काढून एकस्तर ऐवजी वरिष्ट वेतन श्रेणीनुसार वेतन काढन्याच्या पत्राला स्थगिती देऊन gr नुसार सर्व लाभ देण्यात यावे, पदोन्नतिने भरावयाची विस्तार अधिकारी रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, 6 व्या वेतन आयोगाचे 5 ही हफ्ते gpf खात्यात जमा करण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, जिल्ह्यातील कार्यरत सर्व शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्यावत करुन पडताळणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, दि.23/10/2017 च्या शासन निर्णयानुसार आज पात्र ठरत असलेल्या शिक्षकाचे प्रस्ताव मागवून वरिष्ट वेतनश्रेणी मंजूर करावी, 2014 ला नियुक्ति दिलेल्या बी.एस.सी. पात्रता धारक विज्ञान विषय शिक्षकांना नियुक्ति दिनांकापासून वेतन श्रेणी देण्यात यावे, पदवीधर, ऊच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची वरिष्ट वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करावी, प्राथमिक शिक्षकांची निवड श्रेणी यादी प्रकाशित करून आता पर्यन्त किती शिक्षकाना निवड श्रेणी दिली गेली आणि पुढील निवड श्रेणी प्रतीक्षा यादी प्रकाशित करावी, जि.प. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत स्टेट बँकेत करावे किंवा को- कॉपरेटिव्ह बँकेने आमचे खाते सी.जि.एस.पी अंतर्गत करून स्टेट बँक प्रमाने लाभ द्यावा, संघटनेने दिलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक समस्याची कोणती दखल घेतली त्याचा लेखी अहवाल द्यावा, नियुक्ति आदेशासह संघटनेने मागणी केलेल्या सर्व आदेशाची पत्रे ज़ि प आणि पं समितीला बुकलेट च्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, वैद्यकीय प्रतिपूर्ति देयके निकाली काढन्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, 1995 ला नियुक्त पोम्भूर्णा तालुक्यातील अप्रशिक्षित शिक्षकांचे कायमचे नियुक्ति आदेश देण्यात यावेत, मागील व या सत्रात मृत्यू पावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यापैकी सामूहिक अपघात विम्याचा लाभ दिलेल्या शिक्षक कर्मचाऱ्याची यादी संघटनेस देण्यात यावी तसेच प्रलंबित प्रकरणात तात्काळ लाभ देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून व्हावी, या सत्रात बी.एस.सी. पूर्ण केलेल्या विज्ञान विषय शिक्षकांना वेतन श्रेणी मंजूर करावी, नवरत्न स्पर्धेच्या मार्गदर्शन शिबिराच्या लाभापासुन विद्यार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या चिमुर ग शि अ वर कारवाई करावी, मासिक वेतना सह प्रत्येक बाबीसाठी अतिशय विलंब करत असलेल्या जीवति ग.शि.अ. वर कारवाई करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनाचे नेतृत्व विजय भोगेकर राज्य नेते, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, अल्काताई ठाकरे राज्य महिला मंच अध्यक्ष, चंदाताई खांडरे राज्य महिला सल्लागार, नारायण कांबळे जिल्हा नेते, श्याम लेडे माजी राज्य उपाध्यक्ष हे करणार आहेत. जिल्ह्यातून मोठ्या संख्येत शिक्षकांनी 2 मार्च च्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन दीपक वर्हेकर जिल्हाध्यक्ष, रवी सोयाम सरचिटणीस, निखिल तांबोळी कोषाध्यक्ष, लोमेश येलमुले सचिव, अनंता रासेकर प्रमुख संघटक, महिला मंच पदाधिकारी सुनीता इटनकर, माधुरी निंबाळकर, शालिनी देशपांडे, सुलक्षणा क्षीरसागर, उपाध्यक्ष दिलीप इटनकर, सुनील कोहपरे, किशोर आनंदवार, रामेश्वर सेलोटे, अशोक मुसळे, भाऊराव कावळे, अशोक दहेलकर, हेमंत वागदरकर, गजानन घुमे, पी.टी.राठोड, मधुकर दडमल, सुभाष अडवे, प्रभाकर भालतडक, ता.रा.दडमल, अनिल नैताम, प्रभू देशेवार, गजानन चिंचोळकर, गणेश चव्हाण, राजू चौधरी, आकाश झाडे, अर्चना येरने, सरस्वती कोलते, नंदा मस्के, इंदिरा पहानपटे, मीनाक्षी बावनकर, आशा जोगी, द्रौपदी दरेकर, मीना गादम, चंदा धारने, मालती सेमले, मंगला कोमरेल्लीवार, माधुरी काळे, कल्पना महाकाळकर, लता मडावी, सिंधू राठोड, प्रतिभा उदापुरे, मनोज बेले, सुधाकर कनाके, सतीश शिंगाडे, जीवन भोयर, राजू घोरुडे, नरेंद्र मुंगले, गोविंदा गोहणे, जगदीश ठाकरे, बाळू गुंडमवार, संजय चिडे, संदीप कोंडेकर, गणपत विधाते, संदीप चौधरी, सुनील जाधव, रोहिदास राठोड, वहिद शेख, विनोबा आत्राम, रणजित तेलकापल्लीवार, विक्रम ताळे, मनोज बुटले, नरेश बोरीकर, पंकज तांबडे, नरेंद्र डेंगे, पाकमोडे, रामेश्वर मेश्राम, सुधाकर कोल्हे, निरंजन गजबे, विजय कुंभारे, कैलास कोसरे, अतुल तिवाडे व सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.