गुरुमाऊलींच्या जयंती महोत्सवाला आजपासुन प्रारंभ

0
983

अॕड. जयंत महाराज बोधले यांचे ज्ञानेश्वरी भावकथा निरुपण

आकोट /ता.प्रतीनीधी
महावैष्णव गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज यांचा १०२वा जयंती महोत्सव २,मार्चला श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे भक्तीमय वातावरणात प्रारंभ होत असून राज्यातून हजारो वासुदेव भक्त श्रद्धासागर येथे दाखल होत आहेत.
महोत्सवाचा प्रारंभ सकाळी श्रींगुरुंचा महाभिषिके संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले व अन्नदाते यांचे हस्ते तर .संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादाराव पुंडेकर यांचे हस्ते सपत्निक तिर्थस्थापना व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजनाने सामुहिक पारायणाला प्रारंभ होत आहे.दररोज स.८ते १२ दरम्यान पारायणपीठाचे नेतृत्व ह.भ.प.अंबादास महाराज करणार आहेत.

या महोत्सवात सायं.४ते ५ दरम्यान श्री ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक प्रख्यात प्रवचनकार ह.भ.प. अॕड.जयंत महाराज बोधले पंढरपूर यांचे श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरुपण भाविकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.रात्री ८वा ह.भ.प.रामेश्वर महाराज शास्त्री मुंबई यांचे हरिकिर्तन संपन्न होत आहे.
या निमित्ताने विविध धार्मिक ,आध्यात्मिक ,सामाजिक आरोग्य विषयक कार्यक्रम व सेवा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

भव्य मंडप,आकर्षक सजविलेले संतपीठ,मनमोहक विद्युत रोषणाई,वारकरी पताकांचे सुशोभन तथा भोजन,निवास,स्वच्छतागृहे,पिण्याचे पाणी व आरोग्य कक्ष,स्वागत व चौकशी कक्ष तथा ग्रंथ साहित्य विक्री स्टाॕल सह भाविकांच्या सुव्यवस्थेसाठी विविध कार्यगट व सेवासमित्या गठीत करण्यात आल्या असून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या भक्ती सोहळ्यातील विविध कार्यक्रमांना भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या विश्वस्तांनी केले आहे.