ईश्वर चरणी अखंड सेवा देणारे गुरुमाऊलींचे शतायुषी विणेकरी गोविंद बुवा

0
763
Google search engine
Google search engine

आकोट/ता.प्रतिनीधी
गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज यांचे शतायुषी विणेकरी गोविंद बुवा मंगळे बेलुरा हे आज श्री गुरुंच्या जयंती महोत्सवात सहभागी झाले.या निमित्ताने त्यांचे भेटीचा योग आला.श्रद्धेने दर्शन घेतांना भाविक धन्य झाले…..

गोविंदबुवांनी वयाचे १०४ वर्ष नुकतेच पुर्ण केले आहे. आज वृद्धापकाळात प्रकृतीने निरोगी असून कुठल्याही व्याधीपासून मुक्त आहेत. नामस्मरण व श्री गुरुंचा ध्यास हाच त्यांचे जीवनाचा मुलमंत्र झाला आहे.रात्रंदिवस “रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी” अखंड जप करीत
आपले परामार्थिक जीवन ईश्वर चरणी समर्पित करीत आहे.

गुरुमाऊली वासुदेव महाराजांचे ते बालपणातील समवयस्क जीवलग सवंगडी. गुरुमाऊलींच्या संगतीनं त्यांचे जीवनही धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या अंलकृत झालं
आणि महाराजांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्यात निष्ठेने सोबती झाले.गुरुमाऊली च्या संघर्षाचे काळात समर्थपणे साथ देणारे निस्सिम सेवेत म्हणून त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं गुरुमाऊलींना अनुभवलेले ते प्रत्यक्षदर्शी आहेत.
परिसाला स्पर्श झाल्यागत त्यांचं जीवन सुवर्णमय झाल्याचा कृतज्ञ भाव त्यांचे मुखातून प्रगट होतो.
गुरुमाऊलींनी समाज प्रबोधनार्थ प्रवचन,किर्तनाचे माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पालथी घातला.या वाटचालीत गोविंदबुवा देखील एक वाटसरु होते.किर्तनात विणेकरी म्हणूनही त्यांनी अखंड सेवा दिली.महाराजांचे विणेकरी म्हणून त्यांचेकडे आदराने बघीतले जाते.महाराजांचे महानिर्वाणानंतर गोविंद बुवाचे दर्शनाने या अलौकिक सुवर्णकाळाला उजाळा मिळतो…
त्यांचे भेटीत महाराजांचे दुर्मिळ व उल्लेखनीय प्रसंग आजही ते सांगतांना मन गहिवरुन न गेल्यास नवल.अत्यंत निष्काम भक्ती,सात्विक जीवन व शतायुषी जीवनाची परिपूर्णता बघतांना भक्तगणांना गोविंदबुवा यांच्यात साक्षात ईश्वर दर्शनाची अनुभूती मिळते.
गोविंद बुवांचे उर्वरीत आयुष्याची सुखस्वानंदात पुर्णाहुती होवो हीच गुरुचरणी प्रार्थना!