श्री ज्ञानेश्वरी सद् सद् विवेक जागविते – ह.भ.प. प्रमोद महाराज

0
1023
Google search engine
Google search engine

शतायुषी ह.भ.प. गोविंद बुवांचे हस्ते गुरुमाऊली जयंती महोत्सवाचे उद् घाटन

आकोट/प्रतीनीधी
वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज १०२वा जयंती महोत्सवाचा भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. गुरुमाऊलींचे विणेकरी शतायुषी ह.भ.प. गोविंद महाराज मंगळे यांचे हस्ते या भक्ती सोहळ्याचे उद् घाटन पार पडले.पहिल्याचे दिवशी वासुदेव भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे प्रथमपुष्प गुफंतांना प्रख्यात ज्ञानेश्वरीचे प्रवक्ते ह.भ.प. प्रमोद महाराज रहाणे यांनी वारकरी संत महात्म्य विशद केले.सद्गुरु ची सेवेशिवाय ईश्वरीय मार्ग सापडत नाही ज्ञान म्हणजे ईश्वर.गुरु शिवाय ज्ञानोपासना पुर्ण होत नाही. श्री ज्ञानेश्वरीच्या शब्दांकणातून ज्ञान पाझरते. मनुष्यातील सद् सद् विवेक जागविते.आपल्या वाणीची विश्रांती म्हणजे साधूची कथा होय.कान आणि वाचेची तृप्ती ज्ञानेश्वरीत दडलेली आहे.ती वाचावी .चिंतन व मनन करुन आचरणात आणल्सास .जीवन ज्ञान समृद्ध झाल्या शिवाय रहात नाही असे निरुपण प्रमोद महाराजांनी केले.प्रवचनमालेत ह.भ.प. विठ् ठल महाराज इंगळे यांचे प्रवचन पार पडले.

महोत्सवाचा प्रारंभ भागवत ध्वज पुजनाने झाला प्रारंभी श्री गुरुंचे पुजन व गुरु वंदना पार पडली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबारावजी बिहाडे,सचिव रविंद्र वानखडे ,कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर,सदाशिवराव पोटे,त्र्यंबकराव काळमेघ ,कमलताई गावंडे,प्राचार्य गजानन चोपडे,अवि गावंडे,अशोकराव पाचडे, अनिल कोरपे, महादेवराव ठाकरे ,दिलिप हरणे ,नंदकिशोर हिंगणकर ,अॕड.शिरीष ढवळे, प्रा साहेबराव मंगळे,जयकृष्ण वाकोडे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राजेश कुलटआदीसह भाविक भक्त उपस्थित होते.
दरम्यान महोत्सवाचा प्रारंभ श्री गुरुंचा महाभिषेक संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले,अन्नदाते मधुकरराव तराळे ,यांचे हस्ते पार पडला.तिर्थ स्थापना व ग्रंथपुजन जेष्ठ विश्वस्त दादाराव पुंडेकर यांनी सपत्निक केले. ज्ञानेश्वरी सामुहीक पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला.पारायणपीठाचे नेतृत्व ह.भ.प. अंबादास महाराज करित आहेत. पहिल्याच दिवशी गावोगांवचे भाविक पारायणात सहभागी झाले आहेत.

किर्तन मालेत ह.भ.प.रामेश्वर महाराज शास्त्री मुंबई यांचे किर्तनाला गावोगांवच्या भाविक श्रोत्यांनी गर्दी केली होती
ग्राम लामकानी येथील सेवागटांनी भाविकांचे सेवेत मोठ्ठे योगदान दिले.
————————-
महाआरोग्य शिबीर
गुरुमाऊली जयंती निमित्ताने श्रद्धासागर येथे भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न होत असून आकोट व अकोला येथील प्रख्यात डाॕक्टर मंडळी सेवा देत आहेत
या संधीचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनीकेले आहे.