ज्ञानेश्वरी म्हणजे परम् तत्वाचा अविष्कार! – जयंत महाराज बोधले

0
1120

—————————————-
महोत्सवानिमित्य आयोजित आरोग्य शिबीराला १२०० रुग्णांची तपासणी व औषधोपचार
—————————————-
आकोट/प्रतीनीधी
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ समृद्ध असा जीवन मार्ग आहे.ज्ञानेश्वरीत मनुष्याचे जीवनात निर्माण होणा-या गोंधळाचे स्थितिवर ,समस्या आणि प्रश्नावर उत्तर मिळते.ईश्वरीय परम् तत्वाचं ते प्रगटीकरण आहे.सृष्टी निर्माण करण्याचा कार्यकारण भाव त्यात सामावलेला आहे.ज्ञानेश्वरी म्हणजे परम् तत्वाचा अविष्कार आहे.असे चिंतन श्री ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व प्रख्यात प्रवक्ते ह.भ.प.अॕड .जयंत महाराज बोधले पंढरपूर यांनी मांडले.

गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवातील श्री ज्ञानेश्वरी भावकथेचे द्वितीय पुष्प गुंफतांना जयंत महाराज बोलत होते.त्यांनी ज्ञानेश्वरीतील ‘ॐ नमोजी आद्या।वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या।आत्मरुपा।।
या पहिल्याच ओवीचा भावार्थ सांगतांना अनेक दृष्टांत सांगत सिद्धांत पटवून दिला.श्री ज्ञानेश्वरीतील ओवी न् ओवी आणि ओवीतील शब्द न् शब्द हे परम् तत्व आहे.
ज्ञानेश्वरी ॐकारातील असलेल्या निर्गुण परमात्म्याला अर्थात परम् तत्वाला नमन करुन माऊलींनी ग्रंथारंभ केला आहे.

ज्ञानेश्वरी भावकथेच्या दुस-या दिवशी भाविक श्रोत्यांच्या गर्दी श्रद्धासागर पुण्यभूमी फुलून गेली.
दरम्यान अॕड जयंत महाराजांचे स्वागत संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले व सचिव रविंद्र वानखडे यांनी केले.
प्रवचनमालेचे दुसरे पुष्प ह.भ.प.देविदास महाराज वानखडे यांनी केली.प्रारंभी
गुरुवंदना पार पडली.

महोत्सवानिमित्य आयोजित आरोग्य शिबीराला १२०० रुग्णांची तपासणी व औषधोपचार

गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवांतर्गत आयोजित आरोग्य शिबीराला गांवोगांवच्या गरजू रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबीरात अकोला व आकोट येथील सर्जन डाॕ अरुण भागवत,डाॕ पुरुषोत्तम तायडे,डाॕ.प्रविण पाटील, डाॕ शाम मोहोकार,डाॕ शाम मोहोकार,डाॕ नरेंद्र भागवत,अस्थिरोग तज्ञ डाॕ विनोद कोल्हे,डाॕ.चंदन पाटील,फिजिशीयन व हृदय रोग तज्ञ डाॕ दिपक मोरे,डाॕ.श्रीकांत काळे,डाॕ राम बिहाडे,ओझोन हाॕस्पीटलचे अध्यक्ष डाॕ विनित हिंगणकर , मेंदू विकार तज्ञ डाॕ मोनिका मालोकार,नेत्र रोग तज्ञ डाॕ सुहास कुलट,डाॕ अतुल बिहाडे,डाॕ.सौ. शिवाणी बिहाडे,डाॕ सौ.शैलजा बिहाडे,डाॕ दर्शन कुलट,डाॕ.ऐश्वर्या कुलट,स्त्री रोग तज्ञ डाॕ हर्षवर्धन मालोकार,डाॕ रेखा पाटील,डाॕ सीमा तायडे, संजीवनी बिहाडे,डाॕ.गुंजन वडणे, बालरोग तज्ञ डाॕ.अशोकराव बिहाडे,डाॕ.मनोज गांवंडे ,डाॕ..निलजा कोल्हे आदी प्रख्यात डाॕक्टरांनी सेवा देत १२३६ रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केलेत.

श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे रोग निदान,उपचार व औषधोपचार शिबीरात आदी तज्ञडाॕक्टर्स व त्यांचे सहका-यांनी उपयुक्त सेवा दिली.
डाॕ सौ.संजिवनी बिहाडे तेल्हारा,डाॕ सौ. रेखा पाटील यांनी शिबीरासाठी आवश्यक औषधी व साहित्याचा मोफत पुरवठा केला.तर नेत्र शस्त्रक्रियेसाठी ३०रुग्णांची निवड करुन मोफत शस्त्रक्रिया करण्याचा सेवासंकल्प डाॕ.सुहास कुलट यांनी जाहीर केला.
शिबीराचे नियोजन व आयोजनात संस्थेचे विश्वस्त डाॕ अशोकराव बिहाडे, डाॕ सुहास कुलट,जयकृष्ण वाकोडे,राजेश कुलट यांचे मार्गदर्शनाखाली सेवाधारी मंडळ श्रद्धासागरचे प्राथमिक शिक्षकांवृंदांनी खुप परिश्रम घेतले…

तज्ञ डाॕक्टर मंडळी व सेवाधारी शिक्षकवृंदांच्या उपयुक्त सेवेप्रती संस्थेचेवतीने यथोचित सन्मान करण्यात आला.