जिल्हाप्रशासनची धडक मोहिम का नाही?तालुक्यातील अवैध गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक थांबलेली नाही..

0
1235

जिल्हाप्रशासनची धडक मोहिम का नाही?
तालुक्यातील अवैध गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक थांबलेली नाही…

चांदुर बाजार:-/////

चांदुर बाजार तालुक्यात मागील 6 महिण्यापासून होत असलेल्या अवैध गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक थांबलेली नाही. मागील 6 महिन्यांत गौण खनिजांसंदर्भात ठोस अशी कारवाई झाली नाही.तसेच केलेल्या प्रकरणांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच असून इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक जोरात सुरू आहे.तरी मात्र स्थानिक प्रशासन ची कार्यवाही होत नाही आहे.
अवैधरित्या होणाऱ्या गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकार महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय अनेक ठिकाणी वरून मुरूम वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने यामुळे पर्यावरणाची हानीही होत आहे. वाळूच्या उपशासाठी अनेक पर्यावरण चा ऱ्हास केला जात आहे.कारवाईसाठी पथक नेमणूक करण्यात आले मात्र ते पथक फक्त नावालाच असल्याचे दिसत आहे. पोलिसही आरोपींना पकडण्यासाठी तितकासा रस दाखवत नसल्याचे समजते. अनेकदा जिल्हा प्रशासन आणि पोलिस मिळून संयुक्तरित्या गौण खनिज तस्करांवर कारवाईचा बडगा उगारतात. मात्र या कारवाईचाही कोणताही परिणाम तस्करावर होत नाही आणि गौण खनिजाची अवैध वाहतूक आजही सुरू असल्याचे चित्र आहे. अधूनमधून कारवाईमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा उतरते. मात्र नंतर परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र आहे.
शक्यतो वाळू उत्खनन आणि वाहतूक करताना कोणी मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात. मात्र वाळूबरोबर इतरही माती, दगड या गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक होत आहे. कारवाईनंतर संबंधितावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येते. मात्र दंडात्मक कारवाईची भीती गौण खनिज तस्करांना नसल्याचे चित्र आहे.
*हल्ल्याचा एक प्रकार*
वाळू तसेच अवैध गौण खनिजाचे वाहतूक आणि उत्खननप्रकरणी कारवाई करत असताना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे आतापर्यंत एकच प्रकरण घडलेले आहे. हे प्रकरण वाळू संदर्भात असून वाळूमाफियाविरुद्ध यापूर्वी कारवाई करण्यात आली होती.