*लोणी वासियांना दिलेले वचन मी पूर्ण केले. – आ.डॉ.अनिल बोंडे-ऋषिबाबा प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न*

0
775
Google search engine
Google search engine

*अमरावती/वरुड :-*

गेल्या कितीक वर्षापासून वरुड तालुक्यातील लोणी येथील ऋषीबाबा प्रकल्प रखडलेला होता, आधीच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीनि याकडे थोडेहे लक्ष दिले न्हवते. त्यामुळे गेल्या १५ वर्षापसून हा रखडलेला होता. नागरिकांच्या आग्रहामुळे आ. डॉ. अनिल बोंडे यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. व मा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून विदर्भासह राज्यातील लहान व मोठे अपूर्ण असलेले प्रकल्प पूर्णत्वास करण्याकरिता भर दिला आहे.

संपूर्ण राज्यात जलसंधारणाचे कामे मोठ्या प्रमाणावार होत असून सामजिक संस्थांना प्रोत्साहन देत महाराष्ट्र राज्यात जलक्रांती घडवून आणली. याचाच एक भाग म्हणून वरुड तालुक्यातील लोणी येथील ऋषीबाबा प्रकल्पाला अधिक महत्व देत प्रकल्पासाठी ८ कोटी ९४ लक्ष ८३ हजार ६७२ रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे लोणी गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यालाच दुजोरा म्हणून या प्रकल्पाचे काम सुद्धा सुरु झाले.

भूमिपूजन समारंभवेळी आ. डॉ. यांनी म्हटले कि, लोणी या गावाचे माझावर खूप प्रेम आहे, त्यामुळे लोणी मधील कोणताही नागरिक माझ्याकडे येत असेल, त्याच्यात पक्षपात न करता मी त्याना मदत करतो. आपण हा जो मतदार संघात विकास पाहतो हा भाजप सरकारमुळेच शक्य झाले. लोणी गावाला मी गेल्या निवडणुकीत वचन दिले होते, कि लोणी गावाला कधीही पाण्याची कमी पडू देणार नाही, त्याकरीता १६ गाव पाणीपुरवठा योजना सुद्धा सुरु झाली. व त्याचे ९७ लक्ष बिलावरील व्याज जवळपास ३० लक्ष रुपये हे सरकारने माफ केले आहे. व जून २०१९ पर्यंत मोफत पाणी सुद्धा दिले. व लोणी गावाकरिता मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आणली. व ती योजनेचे काम चालू आहे. गरीब जनतेच्या कार्यक्रमाकरिता भव्य असे ३० लक्ष रुपयाचे सभागृह लोणीच्या धरतीवर उभे आहे. गावातील विकासाकरिता ३६ लक्ष रुपयाचे कामे सुद्धा लवकरच करण्यात येत आहे, लोणी गावात युवकांकारीता व्यायाम शाळा व वृद्ध व्यक्ती करिता ओपन जिम सुद्धा लवकरच होणार आहे. त्यामुळे विकास हा होतच आहे. असे आ. डॉ. अनिल बोंडे असे बोलत होते.

यावेळी लोणी परिसरातील ग्रामस्थ बाबारावजी क्षीरसागर, गोपाल मालपे, रोशनी क्षीरसागर, वंदना सावरकर, बलदेव वानखडे, ताराचंद फुटाने, पिंटू मेंढे, जानराव लोखंडे, पंकज मालपे, श्याम पाचघरे, श्याम मालपे, रुपेश मदने, विनोद पाचघरे, विश्वास कुबडे, सुरेश शिंगरवाडे, उमेश अकर्ते, रामराव युवनाते, गोलू झाडे, सतीश देवघरे, रमेश मेंढे,संदीप क्षीरसागर, विलास कुबडे, अरुण पाटील, किशोर नेरकर,संजय सावकर, चेतन सावरकर, मीनाक्षी नेरकर, कविता दरोकर, सविता मालपे, गीता तायवाडे, सुधीर सावरकर, शैलेश मालपे, शुभम पोहरकर, आनद आगरकर, विलीन दारोकर, धीरज अम्बाडकर, श्याम फुटाने, निखील निम्भोरकर शुभम बेलसरे, विशाल कुबडे, दीपक देहणकर, राकेश देशमुख, उमेश कोहळे, मदन काशीकर, किशोर मालपे, सुरेश ढोमणे, रोषण झाडे, मयूर मालपे, प्रमोद मेंढे, चेतन कुबडे, सुरेश खेरडे, अनिल तायवाडे, अमोल डांगोरे आदी शेतकरी सह परिसरातील नागरिकांनी भाजप सरकारचे व आ.डॉ.अनिल बोंडे यांचे आभार मानले