प्रभू आणि भक्तांचे प्रेम अद् भूत असतं! -जयंत महाराज बोधले

0
979
Google search engine
Google search engine

—————————————-
गुरुमाऊली जयंती महोत्सव
श्री ज्ञानेश्वरी भावकथा-पुष्प तिसरे
—————————————-
आकोट (प्रतिनिधी )
भक्तांच्या प्रेमापोटी प्रभू आपले मोठेपण सोडते.भक्तांच्या अंतकरणात भगवंता विषयी प्रेम निर्माण होते.हे प्रेम निष्काम असलं पाहीजे.तेव्हा भगवंत भक्तांसाठी प्रेम करतो.या प्रेमाचा अनुभव घेता येतो पण सांगता येत नाही.बोलता येत नाही.ते सहृदयात प्रकाशित होते.अंतरीचे भक्ती ज्योत प्रज्वलीत होते.हे प्रेमभक्ती परम् सुखाची प्राप्ती करुन देतो.भक्ती आणि कर्म ही निष्काम हवे.अशा आशयाचे चिंतन श्री ज्ञानेश्वरीचे अभ्यासक ह.भ.प.अॕड.जयंत महाराज बोधले यांनी मांडले

गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवातील श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरुपणाचे तिसरे पुष्प गुंफतांना जयंत महाराज म्हणाले.श्री ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाची पूर्वपिठीका त्यांचे शब्दांतीला ताकद भाविक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी होती.ते पुढे म्हणाले श्री ज्ञानदेवांनी प्रभू आणि अर्जून यांच्या अद्भूत प्रेमाची नवलाई अधोरेखित केली.एकीकडे सारथी आणि दुसरीकडे महासत्ताक प्रभू .
असामान्य व अलौकिक प्रभूंच्या नात्यातील नवलाईचं सुंदर वर्णन माऊलींनी रेखाटलं आहे.
कृती आणि युक्तीत अंतर नसावं वृत्तीनं परिणाम होत नाही तर उक्तीनं परिणाम होतो.कारुण्य आहे तेथे वीरता नाही मनातला गोंधळ कर्मापासून दूर घेवून जातो.मन निश्चय आणि विवेकाला भूलवून टाकतो.मनाची स्थिती अत्यंत महत्वाची आहे.आपले इंद्रीयांवर ताबा मिळविल्याशिवाय निश्चय आणि विवेकाने योग्य कृती घडत नाही.कर्मात मनुष्याचा पुरुषार्थ दिसून आला पाहीजे.
कर्मयोग हा संपुर्ण कृती आणि युक्तीचा योग्य समन्वयात घडतो.अर्जुनाच्या अंतरंगाची स्थिती लक्षात घेता कारुण्यामुळेच वीर रस संपून युध्द नको याचा अर्जुनाचा युक्तीवाद सांगतो.

प्रभूंनी अर्जूनाला कर्मवाद सांगून कर्मयोग धर्म पाळण्याचा उपदेश दिला आणि त्यासाठीच आग्रह केला.हा कर्मयोग समजून घेणं,चिंतन करणं आणि तसे आचरण करणं आवश्यक आहे असे शेवटी जयंत महाराज म्हणाले.
प्रारंभी गुरुवंदना पार पडली
प्रवचनमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना ह.भ.प.मोहन महाराज रेळे यांनी गुरु महात्म्य सांगितले.