मेंढ्या चोरणारा अट्टल चोरटा बाळापूर पोलिसांनी केला जेरबंद, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

0
724
Google search engine
Google search engine

अकोला /प्रतीनिधी
मेंढ्या चोरणारा अट्टल चोरटा बाळापूर पोलिसांनी केला जेरबंद,करत दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.पोलीस सुत्रांनुसार खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील मूळ राहणारे व मेंढ्या पाळण्याचा व्यावसाय करणारे बंडू नारायण मदने व त्यांचा पुतण्या ऋषीकेश हे त्यांच्या 300 मेंढ्या घेऊन गावोगाव फिरतात, शेतकऱ्यांच्या शेता मध्ये मेंढ्या बसवून आर्थिक प्राप्ती करतात, अश्याच मेंढ्या घेऊन ते बाळापूर पोलीस स्टेशन च्या हद्दी मधील व्याला शेत शिवारातील संजय कात्रे ह्यांचे। शेता मध्ये मेंढ्या बसविल्या होत्या, दिनांक 13।12।18 चे दुपारी 4 वाजे दरम्यान ऋषीकेश हा रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ मेंढ्या चारीत असतांना अचानक एक कार मेंढ्या जवळ थांबली व त्यातून 2 व्यक्ती अचानक उतरल्या व 5 मेंढ्या कार मध्ये टाकून त्यांनी धूम ठोकली, अचानक घडलेल्या ह्या घटनेने व ऋषीकेश हा दूर उभा असल्याने त्याने सदर कार च्या मागे धावला त्याला सदर कार चा क्रमांक व रंग तेवढा लक्षात राहिला, ह्या चोरीची फिर्याद बंडू नारायण मदने ह्यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सदर बाब गंभीरतेने घेऊन पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी ह्यांना तपास सोपविला, अश्या प्रकारच्या चोऱ्या करणारा बाळापूर येथील अट्टल चोर मनोज निंबाळकर ह्याच्यावर दाट संशय वाटल्याने त्याला चेक केले असता तो फरार आढळून आला, त्या मुळे त्याचेवर संशय अधिक वाढला, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, सुभाष राठोड, हर्षल श्रीवास ह्यांचे पथक त्याचे मागावर असतांना तो पोलिसांना हुलकावण्या देत होता, दरम्यान त्याने चोरी मध्ये वापरलेल्या इंडिका कार चा निळा रंग बदलून पांढरा रंग मारल्याचे व तरोडा तालुका खामगाव येथे नातेवाईका कडे रात्री मुक्कामाला असल्याची पक्की माहिती मिळाल्या वरून पोलिसांनी अचानक धाड मारून त्याला ताब्यात घेऊन त्याची पोलीस कोठडी घेतली सुरवातीला त्याने पोलिसांना दाद दिली नाही, परंतु नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याचे कडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार व 4 मेंढ्या एकत्रित किंमत दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले, पुढील तपास, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी करीत आहे, बाळापूर पोलीस सातत्याने धान्य, जनावरे चोरणाऱ्या चोरांना जेरबंद करीत असल्याने शेतकऱ्यां मध्ये समाधान व्यक्त होत आहे.