शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या नामदेव जाधव या व्यक्तीविरुद्ध शासनस्तरावरून कार्यवाही करा :- संगिताताई शिंदे >< जिल्हाधिकारी अमरावती यांना  निवेदन

0
933
Google search engine
Google search engine

अमरावती :-

ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजनांना देशद्रोही हे शब्द संबोधणाऱ्या व्यक्तीला आपल्या राज्यामध्ये कोणत्या कायद्याने हे अधिकार दिलेले आहे? मागील काही दिवसापासून सोशल मीडियात तसेच प्रसार माध्यमांसमोर शिक्षकांना मास्तरडया, भिकारी यासारखे शब्द उच्चारून स्वतःला अति बुद्धिवान समजणारे अनेक व्यक्ती शिक्षकांची मानसिक अवहेलना करत आहे

अशाच प्रकारे गेल्या काही दिवसात स्वतःला प्राध्यापक म्हणवून घेणाऱ्या नामदेव जाधव या व्यक्तीने शिक्षकांना भर सभेमध्ये देशद्रोही उच्चारून या सांस्कृतिक व शैक्षणिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्र राज्याचाच अपमान केला आहे. अशा व्यक्तींविरुद्ध कार्यवाही होण्यासाठी शासनाने विशिष्ठ कायदा करणे गरजेचे आहे.

शिक्षकांना मारहाण करणे,खोटे आरोप लावून फौजदारी गुन्हे दाखल करणे, अशा विविध बाबीने त्रस्त झालेल्या शिक्षकांना आपले ज्ञानदानाचे काम सुद्धा करावे लागते. कुठलही काम हे चांगल्या मनस्थितीतच उत्तमपणे होत असते. शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून अशा लोकांविरुद्ध कार्यवाही करावी कि जेणेकरून आपल्या या कार्याने शिक्षकांना मानसिक आधार मिळेल, परिणामी आजपर्यंत होत आलेले ज्ञानदानाचे पवित्र कार्य पुढेही होत राहील

तरी शासनाने संबधीताविरुद्ध कठोर कार्यवाही तसेच याबाबतीत योग्य कायदाच तयार करावा निवेदन देण्यासाठी अनिता पाचघरे मॅडम,श्री नितीन गुढधे, विनोद मिसळे, प्रफुल्ल राव,विकास दिवे,उमेश कडू,शरद तिरमारे, प्रविन गुल्हाने,पवन सुरजूसे,राहुल हळवे, सुशांत गुढे,रीतेश खुलसाम सर,भेंडोडकर सर उपस्थित होते