आकोट/ता.प्रतीनीधी
प.पू.प्रल्हाद महाराज(रामदासी)उपासना मंडळ आकोटच्यावतीने सोमवार दि.४मार्च २०१९ ते बुधवार दि.०६ मार्च २०१९ पर्यंत प.पू.प्रल्हाद महाराज रामदासी जंयती महोत्सव उत्साहात पार पडला. निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री.शशांक वामनराव भावे,जवाहर रोड,आकोट यांच्या राहत्या घरी करण्यात आलेत.
महोत्सवा दरम्यान सोमवार दि.०४मार्च ला. सकाळी ६ वा काकड आरती, दुपारी १२.३० प्रसाद ,दुपारी ५ते ६ प.पू.प्रल्हाद महाराज महिला भजनी मंडळ, सांयकाळी ६.१५ ते ७.३० उपासना.
मंगळवार दि.५ मार्च ला. सकाळी ६ वा.काकड आरती, दुपारी १२.३०.ला.प्रसाद, दुपारी ५ ते ६ हभप श्रीराम गदाघर शास्त्री ( आकोला) यांचे प्रवचन. सांयकाळी ६.१५ ते ७.३० उपासना.
बुधवार दि.६ मार्च ला सकाळी ६.१५ काकड आरती ,दुपारी १२.२५ ला (गुलाल )प.पू.प्रल्हाद महाराज जंयती उत्सव. महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.जयंती महोत्सवाचे
आयोजन:-प.पू.प्रल्हाद महाराज(रामदासी)उपासना मंडळ, प.पू.ब्रम्हचैतन्या महाराज उपासना मंडळ, प.पू. गोंदवलेकर महाराज उपासना मंडळ आकोट.यांच्या पुढाकारात करण्यात आले.