पंतप्रधान उज्वल गँस योजनेमुळे महिलांना अच्छे दिवस.ग्रीन पाॅवर शुगर्सच्या विद्यमान चेअरमन सौ. अपर्णा देशमुख.

Google search engine
Google search engine

पंतप्रधान उज्वल गँस योजनेमुळे सामान्य कुटुंबातील महिलांना अच्छे दिवस आले आहेत.असे प्रतिपादन ग्रीन पाँवर शुगर्स चेअरमन अपर्णाताई देशमुख यांनी केले.
कडेगाव येथील वर्धमान एच पी गँस एजन्सीज यांच्या वतीने कडेगाव येथील सुरेशबाबा देशमुख सभागृहात गँस वाटप प्रसंगी बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट नेते चंद्रसेन देशमुख होते.स्वागत व प्रास्ताविक राखी शहा यांनी केले.
पुढे बोलताना अपर्णाताई देशमुख म्हणाल्या की केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सामान्य लोकांच्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. मात्र आपल्या सामान्य कुटुंबातील महिलांच्यासाठी असणारी मोफत गँस योजना हि महिलांच्यासाठी मोठी कल्याणकारी योजना आहे.यामुळे महिलांचा मोठा शारीरिक त्रास वाचणार आहे.आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे.सामान्य कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर असणारे समाधान फार मोठे आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना चंद्रसेन देशमुख म्हणाले आज देशाला आदर्श व लोकहितवादी पंतप्रधान. मिळाले आहेत. देशातील शेतकरी, महिला,तरूण, नोकरदारांना त्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जगातील देशात आपल्या देशाची मोठी प्रतिमा निर्माण केली आहे. भविष्यातील लोकसभेच्या निवडणूकातही भारतीय जनता पक्ष विकास कामाच्या जोरदार देशात आपली सत्ता मिळवेल आणि नरेंद्र मोदिच देशाचे पंतप्रधान बनतील.सामान्य जनता आजही नरेंद्र मोदी यांच्या विकास कामावर खुष आहे.
राजेश शहा म्हणाले कडेगाव तालुक्यात पंतप्रधान उज्वल गँस योजना वर्धमान एच पी गँस एजन्सीच्या वतीनेआदर्श पद्धतीने राबविण्यात आली आहे.आज पर्यंत पंधराशे कुटुंबियांना योजनेचा लाभ दिला आहे.
कार्यक्रमास यावेळी धनंजय देशमुख भैय्या, विजय गायकवाड, नगरसेवक नितिन शिंदे, मारूती माळी, नगसेविका अनिता देशमुखे, आश्विनी परदेशी, शुभदा देशमुख, महिंद्र विभूते,कमाल आत्तार यांच्या सह मोठ्या सख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार श्रीमती स्वप्ना शहा यांनी केले.

फोटो ओळःकडेगाव येथील वर्धमान एच.पी.गँस एजन्सीच्या वतीने महिलांना वाटप करताना अपर्णाताई देशमुख, राजेश शहा,चंद्रसेन देशमुख, राखी शहा व मान्यवर