अवैध केल्या जाणाऱ्या वाळूच्या साठावर कार्यवाही करा.नगरसेवक लविना आकोलकर याचे तहसीलदार आणि ठाणेदार याना निवेदन चांदुर बाजार:-

0
910
Google search engine
Google search engine

अवैध केल्या जाणाऱ्या वाळूच्या साठावर कार्यवाही करा.
नगरसेवक लविना आकोलकर याचे तहसीलदार आणि ठाणेदार याना निवेदन

चांदुर बाजार:-

मागील काही दिवसांपासून चांदुर बाजार शहर तसेच ग्रामीण भागात अवैध वाळूची जोरदार वाहतूक सुरू आहे.मात्र प्रशासन याच्या दुर्लक्षित पणाच्या धोरणामुळे अनेक पर्यावरणीय बाबीची पूर्तता खेळू जात नाही आहे.तरी अधिकारी यांना जाग येत नाही आहे.
तर अवैध रित्या वाळूचा साठा करून नंतर त्याची वाहतूक केली जात आहे.त्यामुळे प्रभागातील विकास कामावर याचा परिमाण होत असल्याची तक्रार लविना आकोलकर नगरसेविका यांनी केली आहे.

स्थानिक चांदुर बाजार शहरातील प्रभाग रामनगर परिसरात शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कडून रात्री च्या वेळी 50 ते 60 टनाच्या वजनाच्या ट्रिपर मधून वाहतूक सुरू आहे.अधिक जास्त वजनामुळे अनेक वेळा प्रभागातील पाईप लाइन फुटली आहे.या होणाऱ्या अधिक जास्त वजनाच्या ट्रिपर मुळे या प्रभाग मधील असलेल्या शालेय विध्यार्थी याच्या जीवि तास धोका पोहचत आहे.तर सदर या वाहतूक मुळे काही अनुचित प्रकार घडल्यास याला प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे आकोलकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

बॉक्समध्ये
*एका जागी रेतीचा साठा करून त्याची वाहतूक केली जाते.मात्र या वाहतूक वेळी कोणत्याही प्रकारचा परवाना दिला जात नाही.त्यामुळे या होणाऱ्या अवैध वाळू तस्करी वर महसूल विभाग चांदूर बाजार कार्यवाही का करत नाही हा प्रश्न आहे.*

प्रतिक्रिया:-
माझ्या प्रभागातून ही 50 ते 60 टन ट्रिपर च्या साहायाने रेती ची वाहतूक होत आहे.यामुळे प्रभागातील पेव्हिंग ब्लॉक हे फुटत आहे.तसेच या वाहतूक मुळे विद्यार्थी याच्या जीवितास धोका पोहचण्याची शक्यता आहे तरी प्रशासन यांनी यावर कार्यवाही करायला पाहिजे.