बुलढाणा जिल्ह्यात वाहतेय परिवर्तनाचे वारे – तुपकरांच्या दौऱ्याला तरूणाईचा जोरदार प्रतिसाद

0
702

Amravati :-

रविकांत तुपकरांचा जळगाव जामोद तालुक्यात झंझावाती दौरा.या दौऱ्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, तरूण वर्गाची मिळतेय मोठी साथ. येनारी लोकसभा निवडणुक ही बुलढाणा जिल्ह्यात नवी क्रांती घडवेल. गावोगावी जनता आता करत आहे नव्या बदलाचा निर्धार..जळगाव जामोद तालुका गंभीर दुष्काळातुन वगळल्याने जनतेच्या मनात प्रस्थापितांच्या विरोधात रोष…
एका आठवड्याच्या आत जळगाव जामोद तालुका गंभीर दुष्काळाच्या यादीत घेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुक्काम ठोकु – असा तुपकरांचा प्रशासनाला इशारा
तुपकरांच्या या झंझावाताने जळगाव तालुक्यातील राजकारण मात्र ढवळून निघाले आहे हे नक्की… दिवसभरात रविकांत तुपकर यांनी झाडेगाव, मानेगाव, खांडवी, अकोला खुर्द, गाळेगाव खुर्द, गाळेगाव बुद्रूक, माऊली, टाकळी पारस्कर, कुरणगाड, भेंडवळ, चावरा, मडाखेड, काजेगाव, बोराळा, उटी, वडशिंगी, खेर्डा, खेर्डा बुद्रूक, सुनगाव आदी गावांना भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी दौऱ्यामध्ये युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुकाध्यक्ष नितीन पाचपोर,रणजित बागल,सय्यद बाहोद्दीन, मोहन पाटील, संतोष गाळकर ,विठ्ठल वखारे,उज्वल चोपडे, रोशन देशमुख,धनजंय पाटील, संतोष गाळकर, योगेश मूरूख,,योगेश खोडे, सुनिल अस्वार, आशिष नांदोकार, अक्रम दौला, संतोष तेल्हारकर, शाम मुळे, बाळु देवचे, यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.