घुईखेडमध्ये चोरांचा सुळसुळाट पोलीस चौकी बनली शोभेची वास्तु

325
जाहिरात
घुईखेड – (शहेजाद खान ) 
               चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड हे गाव चार हजार लोकवस्ती चे गाव असून गावात भुरट्या चोरांनी थैमान घातले आहे. यामध्ये मोटर सायकल, पाण्याची टिल्लू मोटर तर काही ठिकाणी धान्य अशा अनेक वस्तू चोरीला गेलेल्या असुन अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. तर काहींनी बिले नाही म्हणून तक्रारी केल्या नाही. घुईखेड गावात पोलीस चौकी असुन कर्मचारी नसल्याने ती बंद अवस्थेत असल्यामुळे केवळ शोभेची वास्तु बनली आहे. यामुळे भुरट्या चोरांचे प्रमाणात वाढ झाली आहे.
या संदर्भात ठाणेदार उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला पोलीस मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे घुईखेड पोलीस चौकीला द्यायला कर्मचारी नाही. आणि तळेगाव पोलीस स्टेशनची सिमा मोठी असल्यामुळे आहे तेवढे कर्मचारी दैनंदिन कामालाच लागतात. महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त असुन महिला कर्मचाऱ्याची जास्त जागी ड्युटी लावणे शक्य होत नाही. चोरीच्या तक्रारी आल्यास त्याचा सुगावा लावणारच असल्याचे ठाणेदार उपाध्याय यांनी सांगितले.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।