दिवालीबेन सेदानी इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा

483
जाहिरात

घोषवाक्य स्पर्धेसह,चित्रकला स्पर्धा व विज्ञान प्रदर्षनीतील पुरस्कार वितरण

आकोट/ता.प्रतीनिधी
स्थानिक पोपटखेड मार्गावरील दिवालीबेन सेदानी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अकोट येथे ८मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या अध्यक्ष स्मिता सेदानी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रिन्सिपल श्री विजय भागवतकर, प्रशांत मंगळे अभ्यंकर मॅडम होत्या. यावेळी वर्ग तीन व चारच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

तसेच बेटी बचाव या थीमवर आधारित म्हणी व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. स्त्रियांचे जीवनातील महत्त्व आणि मुलगी वाचवणे ही काळाची गरज आहे हे मुलांनी यावेळी आपल्या भाषणातून व घोषवाक्य स्पर्धेतून सांगितले यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तर श्रद्धा इंगळे यांनी यावेळी स्त्रियांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण दिले.

स्मिता सेदानी यांनी यावेळी स्त्रीशिक्षण व जीवन याचे महत्त्व भाषणातून सांगितले प्रिन्सिपल विजय भागवतकर व अभ्यंकर मॅडम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यूकेजी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील महिलांच्या वेशभूषा केल्या होत्या दरम्यान विज्ञान प्रदर्शनी तसेच घोषवाक्य स्पर्धा व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.

दुपारच्या विद्यार्थ्यांनींनी नृत्य नाटिकेतून समाजातील महिलाशक्तीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे संचालन नितीन भास्कर सर यांनी तर आभार प्रदर्शन अमोल पिंजरकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।