परंडा नगराध्यक्षांचा २६ मार्चला फैसला ?

0
1710
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद / प्रतिनिधी
परंडा नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर करून व अधिकार्यांनी परंडा येथील सर्व्हे नंबर २३४ ( ब) हि जागा शासनाने आरक्षित केली आहे त्या जागेचा खोटा झोन दाखला तयार करून खरेदी केली असल्याची तक्रार मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना परंडा नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी व संबंधितांवर गुन्हे दाखल करून परंडा नगराध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी तक्रार देऊन करण्यात आली होती.त्या तक्रारीची आज ता १२ मार्च २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसंपादन विभागात सुनावणी ठेवण्यात आली होती. काहिजणांचे जवाब झाले आहेत.उरवरीत महत्वांचे जबाब तक्रारदार मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली गायकवाड यांच्या समोर घेण्याबाबत येणार असल्याचे समजते .तक्रारदारांची प्रक्रती ठिक नसल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी हि २६ मार्च रोजी याच महिन्यात ठेवण्यात आली आहे.सदर प्रकरणाची परंडा तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. हे प्रकरण मिटले कि काय ? असेही प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे या प्रकरणाला आता वेग आला आसून येणार्या ताखेला नेमके काय घडणार ? याकडे परंडा वाशियांचे लक्ष लागले आहे.