देवदत्त मोरे यांना शिवसेनेची आँफर ; उपनेते व प्रचार प्रमुख पदाचे संकेत ?

1361

देवदत्त मोरे यांना शिवसेनेची आँफर ; उपनेते व प्रचार प्रमुख पदाचे संकेत ?

उस्मानाबाद- उस्मानाबादेतून लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी अपक्ष निवडणुक लढवण्यासाठी उद्योजक समाजसेवक देवदत्त मोरे यांनी कंबर कसली आसल्यामुळे त्यांचा शिवसेनेच्या उमेदवाराला मोठा फटका बसणार असल्यामुळे देवादत्त मोरे यांना शिवसेनेच्या काही दिग्गज नेत्यांकडून शिवासेनेच्या उपनेतेपदी व प्रचार प्रमुख पदाची सुत्राकडून आँफर दिल्याची चर्चा आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबईत शिवसेनेच्या नेत्यासोबत देवदत्त मोरे यांची मिटिंग हि झाल्याची चर्चा आहे .सध्या उस्मानाबादेत लोकसभा निवडणुकीचे कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहिर न केल्यामुळे उमेदवरासह मतदारातही संभ्रम निर्माण झाला आहे.परंतू शिवसेनेने सांभव्य उमेदवार जाहिर केल्याचा मेसेज सोशल मिडियावर फिरत आसल्याचे पहायला मिळत आहे.त्यात उस्मानाबाद लोकसभेसाठी शिवसेनेकडून रविंद्र गायकवाड यांचे संभाव्य उमेदवार म्हणुन नाव आहे. उद्योजक देवदत्त मोरे यांनी सामाजीक कार्यातून मोठ्या प्रमाणात जनमत जमवले आहे.याबाबत देवदत्त मोरे यांच्याशी संपर्क साधला आसता पक्षाने अधिक्रत निवड पत्र दिल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे सांगीतले . त्यामुळे मोरे यांना शिवसेनेने दिलेल्या आँफरला देवदत्त मोरे यांनी जर होकार दिला तर उस्मानाबादसाठी शिवसेनेने दिलेल्या संभाव्य उमेदवाराला मोठा फायदा होणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।