क्रांती साखर कारखान्यातील कामगारांच्या कार्य तत्परते मुळे वाचले हरणाचे प्राण

Google search engine
Google search engine

आज सकाळी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ औंधे, पोपट काळे व सोमनाथ पाटील हे कामावर जात असताना ताकारी टप्पा क्रमांक 2 येथे सागरेश्वर अभयारण्य परिसरातील हरणावर्ती भटकी कुत्री हल्ला करत होती.हे भयानक दृश्य या लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर या लोकांनी त्या हल्लेखोर कुत्र्यांना तिथून पळवून लावले व त्या हरणाला त्यांच्या तावडीतून मुक्त केले .या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हे हरीण जख्मी झाले होते.या तिघांनी सवेदनशीलता दाखवून वन अधिकाऱ्यांना फोन करून तिथे बोलवून ते हरिण वनअधिकारी गुजले साहेब व त्यांच्या सहकारी वर्गाच्या ताब्यात देवून त्या हरणाचे प्राण वाचवले.आपल्या या प्राणी रक्षणाच्या कार्यातून या तिघांनी एक भूतदया दाखवली आहे व प्राणीमित्र म्हणून आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.या तिघांच्या या कार्याचे सर्वत्र कोतुक होत आहे.असा हल्ला झाल्यावर पुन्हा एकदा प्राणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती गोरख नाथ औंधे यांनी दिली आहे.या संदर्भात वन प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले आहे