विदर्भातील प्रतिदेहू कालवाडीत संत तुकाराम बीज सोहळा

0
1284
Google search engine
Google search engine

————————-
आकोट ता.प्रतीनिधी
विदर्भाचे देहू म्हणून वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कालवाडी येथे सालाबाद प्रमाणे जगद्गुरु संतशिरोमणी श्री तुकाराम बीज सोहळ्याचे १५ते २२मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
जगद्गुरु तुकोबारायांचे पहिले मंदीर म्हणून येथील संत मंदिराला वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महात्म्य आहे.गुरुवर्य श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराजांचे प्रेरणेने व ह.भ.प. वै.पंजाबरावजी हिंगणकर यांचे पुढाकाराने या छोट्याशा गांवाला हा तिर्थस्थळाचा बहुमान मिळाला आहे.

या क्षेत्री दरवर्षी संत तुकाराम बीजोत्सव साजरा होतो.ह.भ.प.मोहन महाराज रेळे यांचे नेतृत्वाखाली गाथा पारायण सप्ताह.संपन्न होत असून अखंड नाम ,प्रवचन,किर्तनादी विविध कार्यक्रम दि.१५मार्च पासुन प्रारंभ होत आहे.यानिमित्ताने पंचक्रोशीत उत्साह व नवचैतन्य निर्माण झाला आहे.

महोत्सवा दरम्यान गावात ग्रामस्वच्छता मोहीम राबविली जाते.

या भक्ती सोहळ्याची सांगता बीजोत्सव सोहळ्याने होणार असून पहाटे संताभिषेक,तुकोबाचे पालखीची नगर प्रदक्षिणा तथा ह.भ.प.ज्ञानेश प्रसाद पाटील यांचे काल्याचे किर्तन तद्नंतर महाप्रसाद होईल.या भक्ती सोहळ्यात भाविकाlनी उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प.अनंत महाराज हिंगणकर तथा कालवाडी ग्रामस्थांनी केले आहे.