स्मृती दिन आणि वाढदिवस निमित्त अन्नदान आणि किराणा चे विसावा वृधश्रम या ठिकाणी वाटपअग्रवाल आणि रावल परिवाराचा पुढाकार

0
1490
Google search engine
Google search engine

स्मृती दिन आणि वाढदिवस निमित्त अन्नदान आणि किराणा चे विसावा वृधश्रम या ठिकाणी वाटप
अग्रवाल आणि रावल परिवाराचा पुढाकार

चांदुर बाजार //प्रतिनिधी

चांदूर बाजार तालुक्यात पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या तोंडगाव विसावा वृद्धाश्रम याठिकाणी राहुल राजेंद्र अग्रवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि पद्माताई रावल यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले.
अग्रवाल आणि रावल कुटुंबियांनी या ठिकाणी राहणार वृद्धांना जेवणासाठी आवश्यक असणारा किराणा तसेच किरणातील इतर साहित्य इत्यादी सर्व याठिकाणी उपलब्ध करून दिले.
त्यांच्या या सामाजिक कार्याचा सर्व स्तरावरून प्रशंसा होत आहे.तर या ठिकाणी असलेल्या वृद्धांना आपल्या जेवणाचा प्रश्न काही काळ पर्यंत तरी सुटला आहे.
मात्र या ठिकाणी असलेल्या त्यांना वृद्धांना समाजातून एका मदतीच्या हाताची गरज असल्याचे दिसत आहे.मागील काही काळापासून याठिकाणी अनेक मदतीचे हात समोर आले आहे.यात अंत्यत सिहाचा वाटा आहे तो म्हणजे सतत समाजकार्य ची ओढ असणारे विनोद कोरडे आणि मनोज कटारिया आणि त्याचे मित्र परिवार.
यावेळी पत्रकार बादल डकरे, विकास सोनार चांदुर बाजार पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शहरात भस्मे,पोलीस कॉन्स्टेबल पंकज फाटे आणि संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते .
त्यांना दिलेल्या की अन्नदान मधून एक कुठेतरी समाजात प्रति समाजकार्याची आवड असणाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे म्हणण्यात वावगे ठरणार नाही.