श्री शिवाजी महाविद्यालय अळंबी उत्पादन या विषयावर कार्यशाळा संपन्न

0
1236
Google search engine
Google search engine

(आकोट,ता.प्रतीनिधी) – श्री शिवाजी महाविद्यालय आकोट येथे 12 मार्च रोजी प्राचार्य डॉ. ए. एल. कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतिशास्त्र विभागातर्फे अळंबी उत्पादन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान विभाग प्रमुख डॉ. एस. पी. वाघ तर प्रमुख वक्ते म्हणून अमरावती येथील प्राध्यापक डॉ. डी. व्ही.हांडे, डॉ. एम. एम. ढोरे व कार्यशाळेचे संयोजक डॉ एस. एन. पाटोळे उपस्थित होते.

पहिल्या सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक डॉ. डी. व्ही. हांडे यांनी कोळंबीचे उत्पादन कसे करावे यावर सखोल माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. पी. वाघ यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विज्ञान विभागातील दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. एन. पाटोळे यांनी तर संचालन कु. अश्विनी फोकमारे हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. एम. एम. ढोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. असे प्रसिद्धी प्रमुख प्रा. अरूण हिंगणकर कळवितात.