तुकाराम महाराज सर्वश्रेष्ठ संत – ह.भ.प.वासुदेव महाराज महल्ले

0
1395
Google search engine
Google search engine

————————-
संत तुकाराम बीज महोत्सवास प्रारंभ
————————-
आकोट (प्रतिनिधी)दि.१६
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अधिकार भगवंतपेक्षाही मोठा आहे.परमार्थिक पुरुषार्थ गाजविणारे ते , संत आहेत.आणि म्हणून तुका सर्व श्रेष्ठ म्हणून आम्हा प्रिय थोर आहेत असे भावपूर्ण उद् गार श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष व किर्तनकार ह.भ.प.श्री वासुदेवराव महल्ले यांनी काढले

विदर्भाचे देहू म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कालवाडी येथील संत तुकाराम बीज सोहळ्यातील किर्तनमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ह.भ.प.वासुदेवराव महाराज महल्ले बोलत होते.”धन्य तुकोबा समर्थ। ज्यांनी केला पुरुषार्थ।। या प्रस्तृत रामेश्वर भट्ट यांचे अभंगाचा भावार्थ सांगतांना ते पुढे म्हणाले. जगद्गुरुं तुकाराम महाराज श्रीमंत आणि ज्ञानयोगी होते.त्यांचा अभंग गाथा सर्वसामान्यांचा जीवन गाथा आहे.

छत्रपती शिवरायांचे ते खरे गुरु आहेत.त्यांनी आळंदीचे माऊलींचे मंदीर बांधले,माऊलींची बंद पडलेली वारी सुरु केली.आपल्या योगसामर्थ्याने स्वराज्याचे रक्षण केले.ज्ञान भक्ती वैराग्याची मुर्त्ती असलेल्या तुकोबांनी सामान्य माणसाला देवत्व प्राप्त करुन दिले. तुकाराम नांवातच मोठी शक्ती आहे.त्यांची गाथा वाचणा-याचा माथा हा सुपीक होतो असे महल्ले महाराज म्हणाले. किर्तनाला ह.भ.प.अंबादास महाराज ,श्रद्धासागरचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर व पचक्रोशीतील भाविक हजर होते.

महल्ले महाराजांनी गुरुवर्य वासुदेव महाराजांची पुण्याईने कालवाडी मंदीराचे महात्म्य सर्वदूर पोहोचले आहे.वै.पंजाबरावजी हिंगणकर यांचे पुण्यस्मरण करुन त्यांनी भाऊंच्या कार्यकतृत्वाला उजाळा दिला.

दरम्यान येथे संत तुकाराम बीजोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.ह.भ.प.अनंत महाराज हिंगणकर यांचे हस्ते सपत्निक संताभिषेक केला.विणा व गाथा पुजन करुन अखंड नाम व गाथा पारायणाचा प्रारंभ झाला.पारायणपीठाचे नेतृत्व ह.भ.प.मोहन महाराज रेळे व श्रीकृष्ण महाराज हिंगणकर करीत आहे

या भक्ती सोहळ्यात कालवाडीच्या युवक मंडळी या निमित्ताने सप्ताहभर संपुर्ण ग्राम स्वच्छता मोहीम राबवित असून सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ या मोहीमेत सहभागी झाले आहेत.