कृषी उत्पन्न बाजार समिती मधील पारंपरिक धान्य बाजार सुरू करा.सरपंच आणि शेतकरी वर्गाची तहसीलदार आणि सहायक निबंधक कडे मागणी,अन्यथा आंदोलन करूचांदुर बाजार:-

0
799
Google search engine
Google search engine

कृषी उत्पन्न बाजार समिती मधील पारंपरिक धान्य बाजार सुरू करा.
सरपंच आणि शेतकरी वर्गाची तहसीलदार आणि सहायक निबंधक कडे मागणी,अन्यथा आंदोलन करू

चांदुर बाजार:-

चांदूर बाजार येथील पारंपारिक भरणारा कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार हा संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे बंद करण्यात आला आहे.
मात्र या बंद झालेल्या धान्य बाजार मुळे शेतकरी वर्गमध्ये रोष पाहायला मिळत आहे. तर येणाऱ्या 15 दिवसाच्या आत जर धान्य बाजार सुरू केला नाही तर हे सर्व शेतकरी ही तीव्र आंदोलन करत असल्याचे निवेदन तालुका तहसीलदार सहाय्यक निबंधक आणि बाजार समिती सचिव सभापती यांना शेतकरी वर्ग यांनी दिला आहे .
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरत असलेला धान्य बाजार हा प्रसिद्ध असून दर रविवारी हा बाजार भरत होता मात्र संचालक मंडळाने कोणत्या निर्णयाच्या आधारे हा भरत असलेला धान्य बाजार बंद केला आहे याची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी शेतकरी वर्गाने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे तर या बंद झालेल्या धान्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे दर रविवारी भरणारा धान्य बाजार हा आठवड्याचे इतर दिवस सुरू करण्यात आला आहे मात्र आठवड्याचे इतर दिवस जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे बाजार समिती येथील बाजार भरतो त्यामुळे चांदुर बाजार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरत असलेल्या बाजार कडे बाहेरील व्यापारी परखडत सुद्धा नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपला मान बाजार समितीतील व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.
तर या बंद केल्याल्या धान्य बाजार चा परिणाम हा जनावराच्या बाजरावर सुद्धा झाला आहे.आपले धान्य विकून शेतकरी वर्ग शेळी,किंवा त्याला आवश्यक असणाऱ्या जनावर ची धान्य विकून मिळालेल्या पैशात खरेदी करत होता.मात्र बाजार बंद परिमाण त्याच्यावर सुद्धा झाला आहे.
यावेळी निवेदन देताना चांदुर बाजार तालुक्यातील सुरेश वानखडे,अरुण गोडेकर, सुरज चव्हाण,राहुल घुराडे,अमोल भोगाडे,अरुणा मानापुरे,दीपाली गोडेकर, गजानन ठाकरे,श्रीकृष्ण मुदाने,प्रदीप बंड, मंगेश ठाकरे,नीळकंठ चव्हाण, रोशन कांबळे इत्यादी शेतकरी आणि सरपंच उपस्थित होते.

बॉक्समध्ये
दर रविवारी भरणारा धान्य बाजार बंद करून आपल्या जवळील व्यापारी वर्ग याना फायदा करून देण्याचे तर कृषी उत्पन्न बाजार समिती चे धोरण नाही अशा प्रश्न सध्या तालुक्यातील ग्रामीण आणि शेतकरी वर्गात चर्चाच विषय ठरत आहे.