आयटी अभियंत्याने आपल्याच साडेतीन वर्षाच्या मुलाला चाकूने मारून संपवल

पत्नीवर संशय, विकृतीचा कळस; तीन वर्षांच्या निष्पाप मुलाला चाकूने संपवलं, या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.

 

पुण्यातील चंदननगरमध्ये घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. पत्नीवर संशय घेत एका आयटी अभियंत्याने आपल्या निष्पाप तीन वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून केला. हिम्मत माधव टिकेटी (वय ३.५ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. हा संतापजनक प्रकार शुक्रवारी (२१ मार्च) नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी, विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी उघडकीस आला.

माधव साधुरात टिकेटी (वय ३८, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे आरोपी पित्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टणमचा असून, २०१६ पासून पुण्यात स्थायिक आहे. या घटनेची तक्रार मृत मुलाची आई स्वरूपा माधव टिकेटी (वय ३०) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात दिली.