निवडणुकीच्या कामांमुळे अधिकाऱ्यांचे वाढले कामांचे ‘टेंशन’ दिवस – रात्र काम सुरू

0
631
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागल्याने सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. निवडणुकीच्या कामांसोबतच कार्यालयीन कामांमुळे अधिकारी वर्गाचे ‘टेंशन’ वाढले असुन दिवस – रात्र अधिकारी वर्गांचे जोमात कामे सुरू आहे.
लोकसभा मतदार संघाच्या निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असुन निवडणुकीची तयारी प्रशासनातर्फे युध्दपातळीवर सुरू आहे. सद्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. अत्यंत चोखपणे निवडणुक प्रक्रिया पार पडावी या करीता अधिकारी, कर्मचारी दिवस – रात्र एक करून जबाबदारीने आपले कार्य पुर्ण करतांना दिसत आहे. असेच कार्य आता ११ एप्रीलपर्यंत सतत सुरू राहणार असुन अधिकाऱ्यांच्या कामांचे ‘टेंशन’ वाढत चालले आहे. हे काम सुरू असतांना स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना कार्यालयीन कामाकाज सुध्दा करत राहावे लागत आहे. सद्या विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे काढण्याची लगबग सुरू असुन तत्काळ कागदपत्रांवर सही व्हावी यासाठी विद्यार्थीवर्ग सतत कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु निवडणुकीच्या धामधुमीत थोडा उशिर का होईना उपविभागीय अधिकारी रात्रीचे सुध्दा या कागदपत्रांच्या गठ्ठांवर सह्या करीत आहे. तसेच तहसीलदारांचे सुध्दा कार्यालयीन कामकाज सुरूच आहे. असे असतांना मात्र आता महसुल अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कामांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे असुन शासनाचा महसुल बुडणार नाही याची दखल सुध्दा घेणे महत्वाचे आहे. कारण अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेचा फायदा परिसरातील अनेक जण घेत असुन समृध्दीच्या महामार्गासाठी नियम संबंधित कंत्राटदारांकडून धाब्यावर बसविल्या जात आहे. तसेच शासकीय कामांचे नुकसान सुध्दा समृध्दी महामार्गाच्या ट्रकांकडून होत असुन कालव्याचे काम चोरीच्या रेतीने सुरू असल्याची परिसरात चर्चा आहे. त्यामुळे अधिकारी वर्ग निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त आता यासाठी कोणती पर्यायी व्यवस्था करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.