वृद्ध असो की जवान, सर्वांनी करा मतदान जनजागृती रॅलीने चांदूर रेल्वे शहर दुमदुमले पं.स. चा उपक्रम

0
826
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शाहेजाद खान )

जागरूक नागरिक मी भारताचा, हक्क बजावीन मी मतदानाचा, वृद्ध असो की जवान, सर्वांनी करूया मतदान अशा घोषणांनी मंगळवारी चांदूर रेल्वे शहर दुमदुमले निमित्त होते. संपुर्ण शहरातुन मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच स्थानिक पंचायत समिती तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन पं.स. च्या सभागृहात करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, विस्तार अधिकारी श्रीमती म्हसतकर, आरोग्य परिवेक्षक डी. एम. अडगोळकर, महिला बाल कल्याण अधिकारी वर्षा व्यवहारे, विषयतज्ञ विवेक राऊत उपस्थित होते.

पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकी मध्ये मतदानाचा टक्का वाढावा या साठी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याभर राबविण्यात येत असलेल्या ‘स्वीप’ या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटांच्या महिला यांना व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या मतदान जनजागृती कार्यशाळेला बहुसंख्येने अंगणवाडी सेविका, आशा, बचतगट महिला उपस्थित होत्या. यावेळी या महिलांना मतदानाचे महत्व, निकोप लोकशाहीचे महत्व, मतदान जागृती, भारतीय संविधान याबाबत गटविकास अधिकारी श्री पोळ यांनी माहिती सांगितली. त्यानंतर शहरातुन महिलांनी उत्स्फूर्त रॅली काढली. यावेळी मतदान जागृतीसंदर्भात घोषणा दिल्या. सर्व महिलांनी व्हीव्हीपॅट चे महत्व समजून घेतले आणि सामान्य मतदारांना त्यांची जाण करून देण्याची व मतदान करण्याची शपथ यावेळी घेतली.