आचारसंहितेच्या कारणाखाली पोलिसांनी पिंपरी (पुणे) येथील अफझलखानवधाचे फलक हटवले

0
919

आचारसंहितेचा आणि अफझलखानवधाच्या फलकाचा काय संबंध ? सत्य इतिहास समाजासमोर आणण्यास निवडणुकीचे निमित्त करून आडकाठी केली जाणे, हे अन्यायकारक आहे !

पिंपरी – शिवजयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, तसेच अन्य ठिकाणी अफझलखानवधाचे फलक लावण्यात आले होते; पण निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना ते फलक हटवण्याची सूचना केली. कार्यकर्त्यांनी नकार देत सत्य इतिहास समाजासमोर मांडण्याची भूमिका घेतली होती; पण अखेर १८ मार्चला मध्यरात्री ते फलक काढण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या या कृतीविषयी समाजात चीड व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष आभार – सनातन प्रभात वृत्त संकेतस्थळ