————————-
आकोट/प्रतीनिधी
विदर्भाचे देहू श्री क्षेत्र कालवाडी येथे सालाबादप्रमाणे वारक-यांचे दैवत जगद्गुरु संतशिरोमणी श्री तुकाराम बीज सोहळा आज शुक्रवारला भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे.
फाल्गुन वद्य द्वितिया तुकाराम बीजेला कालवाडीला वारकरी भाविक हजेरी लावून तुकोबारायांचा पायी श्रद्धेने नतमस्तक होत धन्य होतात.बीज सोहळ्या निमित्त पहाटे संताभिषेक,गाथा पालखी सोहळ्याची नगर प्रदक्षिणा तथा ह.भ.प.ज्ञानेश प्रसाद पाटील यांचे वैकुंठगमण अभंग व काल्याचे किर्तन तथा महाप्रसादाने या भक्ती सोहळ्याची पुर्णाहूती होईल.देहूला जावू न शकणा-रे तुकोबा भक्त संत दर्शनार्थ मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात.
गत सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमासह काकड आरती,गाथा पारायण,प्रवचन ,हरिपाठ व हरिकिर्तननादी कार्यक्रमाने या छोट्याशा गांवी भक्तीरंग खेळत अख्ख गांव तुकोबाच्या भक्तीधारेत न्हाऊन गेले आहे.
बीज सोहळ्यात भाविकांनी सहभागी होवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बीज महोत्सव समिती तथा गांवक-यांनी केले आहे.