प्रादेशिक वनविभागाच्या आग दुर्घटनेची सखोल चौकशी करावी _गोरखनाथ औंधे

प्रादेशिक वनविभाग हद्दीमध्ये सामील असलेल्या सोनहिरा खोऱ्यातील वन परिक्षेत्र भागामध्ये घडणाऱ्या आग दुर्घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरखनाथ औंधे यांनी मुख्य वन संरक्षक कोल्हापूर वनपरिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात औंधे म्हणाले की, या वन परिसरात सातत्याने अशा प्रकारे आग लागण्याच्या दुर्घटना घडत आहेत.21मार्च रोजी लागलेल्या आगीमध्ये हजारो एकर वन क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच या वन क्षेत्रामध्ये अधिवास करणारे सरपटणारे प्राणी यांचे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे .तसेच या परिसरात असणाऱ्या हरीण,साभार ,चितळ काळवीट यांच्या सारख्या प्राणी जांतीच्या खाद्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे या प्राण्याच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे.
यावेळी पुढे म्हणाले की, अशा प्रकारच्या दुर्घटणांमुळे पारिस्थितीकिय असमतोल निर्माण झाला आहे.तरी सादर आग दुर्घटनेची आपण सखोल चोकशी करून सबंधित अधिकाऱ्यांवर सदर घटनेची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी व भविष्यकाळात अशा दुर्घटना होवू नयेत म्हणून योग्य ती उपायोजना करावी अशी मागणी औंधे यांनी केली आहे.