२२ वर्षीय युवकाचा खुन

0
1288

शेगाव :- शहरातील तीन
पुतळे परिसरात एका २२ वर्षीय
युवकाचा चाकूने भोसकून खून
केल्याची घटना २२ मार्च रोजी रात्री ९ वाजे दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.
स्थानिक तीन पुतळा
परिसरातील अक्षय अशोक
वानखडे वय २२ असे खून
झालेल्या युवकाचे नाव आहे.
त्यास भारत सीताराम शेगोकार व इतरांनी छातीत व पोटावर चाकूने वार करून भोसकले, मृतक याचा मोठा भाऊ आशिष याने काही दिवसांपासून भारत सीताराम शेगोकार यांची
मुलगी कु. साक्षी सोबत प्रेमसंबंध होते. व त्यांनी २२ मार्च रोजी त्यांनी लग्न केल्याचे समजल्याने
कु.साक्षी हिचे वडिल भारत
शेगोकार व इतरांनी याचा राग मनात धरून अक्षयचे घरी रात्री ८.३० ते ९ वा दरम्यान जाऊन वादातून त्याचे छातीवर धारदार
चाकूने सपासप वार करत त्यास जागीच ठार मारले.
सदर घटनेची माहिती मृतक
मुलाचे आईने शहर पो. स्टे. ला दिली वरून ठाणेदार सूनिल हूड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी
पोहचले.
पोलिसांनी सदर युवकाचे प्रेत ताब्यात घेऊन
शवविच्छेदन साठी स्थानिक
सईबाई मोटे रुग्णालयात
आणले. यावेळी परिसरातील
नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या खूनप्रकरणी पोलिसांनी
आरोपी भारत शेगोकार यास चाकूसह ताबडतोब अटक केली आहे तर इतर फरार झाले
त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री
उशिरापर्यंत पोलिसांची
कार्यवाही सुरू होती.