*शिक्षक संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन : महिला, अपंग शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी

Google search engine
Google search engine

महिला शिक्षकांना निवडणूक कामातून वगळावे. तसेच अपंग आणि गंभीर आजारी असलेल्या शिक्षकांना ही निवडणूक कामातून वगळावे. अशी मागणी कडेगाव तालुका शिक्षक संघ्याच्यावतीने उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निडणूक निर्णय अधिकारी मारुती बोरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष गोरखनाथ मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महिला शिक्षिकांना निवडणूक कामातून वगळावे.अपंग शिक्षक कर्मचारी, गंभीर आजार असलेले शिक्षक यांना वगळावे, निवडणूक कामात प्राथमिक शिक्षकांना केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक नको. निवडणुकीचे भत्ते त्याच दिवशी त्याच ठिकाणी वितरित व्हावे. बीएलओ शिक्षकांना निवडणूक कर्मचारी आदेश नको. बीएलओ शिक्षकांना शनिवार व रविवार या दिवशी काम देऊ नये. यासह विविध मागण्या केल्या आहेत.शिक्षकांच्या मागण्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करून निर्णय घेणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बोरकर यांनी सांगितले.यावेळी कमल पवार, शारदा यादव, शोभा बाबर, कल्पना मोहिते, अशोक महिंद, धनंजय नरुले, तुकाराम कांबळे, मुकंद करांडे, संजय महिंद, प्रदीप पवार, सत्यवान गायकवाड, सुरेश जगदाळे, बाजीराव जगदाळे, बाबासो शिंदे, अमोल हुमे, किरण पाटील, जनार्धन ढाणे, सुभाष शिंदे, संजय भोसले, सतीश ढेकळे, समाधान दाभोळे, जयसिंग कुंभार, सतीश गायकवाड यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.