आचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या युवकाला हातात तलवार घेण्यास विरोध !

0
1036
Google search engine
Google search engine

यावल (जळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक

  • चाळीसगाव (जळगाव) येथे मुसलमानांनी उरुसानिमित्त काढलेल्या तलवार मिरवणुकीवर पोलिसांचा कोणताही आक्षेप नाही !
  • केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांच्यावेळी आचारसंहिता आठवते का ?

जळगाव – महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २३ मार्च या दिवशी शहरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत एका तरुणाला घोड्यावर स्वार करण्यात आले; मात्र पोलिसांनी आचारसंहितेच्या नावाखाली त्या तरुणाला हातात तलवार घेण्यास विरोध दर्शवला.  या घटनेने तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याची भावना निर्माण झाली आहे. दुसरीकडे चाळीसगाव येथे याच दिवशी मुसलमानांच्या उरुसानिमित्त काढलेल्या संदलीच्या वेळी हातात तलवार घेऊन मिरवणूक काढण्यात आली; मात्र याला पोलीस प्रशासनाकडून कोणताही आक्षेप घेण्यात आला नसल्यासे समजते.