श्री आनंदराव अडसूळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती

0
765
Google search engine
Google search engine

अमरावती :-

पश्चिम विदर्भातील शिवसेना-भाजप युतीचे लोकसभा उमेदवारांनी सोमवारी रोजी हजारो शिवसैनिक, भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, पालकमंत्री प्रविण पोटे व भाजप-शिवसेना लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी रॅलीद्वारे जावून खासदार अडसूळांनी उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.