मराठवाडा टीव्ही चॕनलच्या परळी तालुका प्रतिनिधी पदी प्रा.दशरथ रोडे यांची नियुक्ती.

0
880

 

परळी प्रतिनिधी . नुकतेच 24 मार्च रविवारी पारपडलेल्या बैठकीत मराठवाड्यामध्ये मराठवाडा टीव्ही चॅनेलने औरंगाबादच्या भव्य मोठ्या पंचतारिक हॉटेलमध्ये जिल्ह्याच्या व तालुक्याच्या बीड औरंगाबाद उस्मानाबाद जालना हिंगोली नांदेड पदांची नियुक्ती करण्यात आली. मराठवाडा टीव्ही चॅनेल चे मुख्य संपादक भराडे सरांनी जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र देण्यात आले

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणून  परळीकडे पाहिले जाते या परळी तालुक्यात मराठवाडा टीव्ही चॅनलच्या तालुका प्रतिनिधी पदी प्राध्यापक दशरथ रोडे यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी आठ जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी यांना  तेथील तालुका प्रतिनिधी म्हणून ओळखपत्र व नियुक्ती पत्र देण्यात आले. संपूर्ण जगामध्ये इलेक्ट्रॉनिक मिडीया. व्हाट्सअप, ट्विटर, फेसबूक, या नवीन वसाहतीमध्ये एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी मराठवाड्या मधून मराठवाडा टीव्ही चॅनेल चे गेल्या दोन वर्षापासून समाजकारण अर्थकारण सांस्कृतिक गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर नेहमीच उठाव करणारी ही नवीन चैनल व गोरगरीबांच्या प्रश्नावर नेहमीच वाचा फोडण्यासाठी एक नवीन विचार घेऊन काम करण्याची उमेद मराठवाडा टीव्ही चॅनेल चे मुख्य संपादक भराडे सरांनी मराठवाड्यातील सर्वात जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी व तालुका प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना मुख्य संपादक भराडे साहेबांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन सुद्धा केले.