कडेगावात पोलीस आणि पत्रकारांत रंगपंचमी निमित्त  रंगला क्रिकेट सामना

Google search engine
Google search engine

सांगली जिल्ह्यातीलकडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्या पुढाकाराने रंगपंचमीनिमित्त पोलीस विरुद्ध पत्रकार यांच्यात क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला. सामन्याचा प्रारंभ ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांच्या हस्ते करण्यात आला. नाणेफेक जिंकून कडेगाव पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष हिराजी देशमुख यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी.जेष्ठ नागरीक.माणिकराव देशमुख,मानसिंगराव (बापु.) देशमुख,ज्ञानेश्वर शिंदे ओंकार देशमुख उपस्थित होते……आठ षटकांच्या सामन्यात पत्रकार रजाअली पिराजादे यांनी धुवाॅधार ४षटकार ३ चौकार मारून नाबाद अर्धशतक तडकावले पत्रकार टीमचा स्कोर ८4 झाला.प्रत्युत्तरादाखल पोलीस संघाने 7 व्या षटकात विजय संपादन केला. हवालदार संपत जाधव यांनी दमदार अर्धशतक ३षटकार व ४ चौकार मारत चौफेर टोलेबाजी करत अर्धशतक झळकीवले.पत्रकार संघाकडून विदर्भ २४ न्युज चॅनल चे प्रतिनिधी हेमंत व्यास यांनी नेत्रदीपक यष्टीरक्षण केले. स्वप्नली पवार यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. दै.पुढारीचे व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रजाअली पीरजादे यांना बेस्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. हवालदार संपत जाधव मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले.दरम्यान सामाना संपल्यानंतर पोलीस, पत्रकार व जेष्ठ नागरिकांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. सर्व पत्रकार व नागरीक यांना अल्पोपहार व चहापान करून सांगता झाली यावेळी पत्रकार प्रविण पवार,मोहन मोहीते,राजु मोहीते,शिवाजी मोहीते, आप्पासाहेब चव्हाण,स्वप्निल पवार,सचिन मोहीते.सर्व पोलिस स्टेशनचे कर्मचारी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष म्हणजे सामना सुरू होण्यापुर्वी धुवाॅधार पाऊस व वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू होता.