वांगीतील तरुण वारकरी मंडळींनी घालून दिला नवा आदर्श

Google search engine
Google search engine

विठ्ठल म्हंटल की महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय चे प्रतीक व तमाम भाविकांचे श्रध्दास्थान .वांगी गावाला सुध्दा वारकरी संप्रदायाचा मोठा इतिहास आहे .वांगी गावामधे मोठ्या प्रमाणात वारकरी लोक आहेत.अनेक पिढ्यांपासून हा वसा आणि वारसा वांगी मधे जपला गेला आहे.पुंडलिकाच्या निस्वार्थी भक्तीला धावून येणारा विठ्ठल सर्वपरिचित आहे .परंतू वांगी गावच्या पडझड होण्याच्या मार्गावर असणाऱ्या मंदिरामध्ये बंदिस्त झालेल्या विठ्ठल रुक्मिणी या दैवतांना नवनिर्मित करण्यासाठी येथील मंदिराचे व सभामंडपाचे काम लोकवर्गणीतून करण्यासाठी तरुण वारकरी दत्ता पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली महादेव होनमाने (दादा) रामदास सूर्यवंशी ,अरुण मोहिते(सर),सचिन (अण्णा)मोहिते, सत्पाल मोकळे, शांताराम पाटील,राहुल सूर्यवंशी,पोलिस झेंडे साहेब यांच्यासह अनेक तरुणांनी एकत्र येवून पुढाकार घेवून हे ५०लक्ष रुपयांपर्यंत मंदिर व सभामंडप साकारला आहे.गावगाडातल्या अनेक निरर्थक गोष्टींसाठी गावातील युवक एकत्र येताना दिसतात.पण या वारकरी तरुणांनी एकदिलाने पांडुरंगाच्या अंगणामध्ये एकत्र येवून अडगळीत पडलेल्या विठ्ठल_ रुक्मिणी या आराध्य देवतांचे लोकवर्गणीतून भव्य मंदिर व सभामंडप उभारण्याचे भव्यदिव्य काम पार पाडत आहेत.या स्तुत्य व अनोख्या उपक्रमाची चर्चा गावातील प्रत्येक भागात आज होत आहे. खऱ्या अर्थाने लोकवर्गणीतून एवढे मोठे कार्य सामान्य कुटुंबातील असलेल्या तरुणांनी मोठ्या हिमतीने केल्याने या तरुण वारकरी मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .स्वच्छ व पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून अशा वेगळ्या व अभिनव कार्य करणाऱ्या या युवकांना वांगी गावच्या तमाम ग्रामस्थांकडून व गावातील कानाकोपऱ्यात सामावलेल्या सर्व वारकरी मंडळींकडून मानाचा मुजरा..