मराठी पत्रकारीतेतील आगळे वेगळे रसायन व मराठी पत्रकारीतेच्या क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे जेष्ठ पत्रकार मा.श्री.भाऊ तोरसेकर साहेब.
१९६८ साली आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकापासुन पत्रकारितेची भाऊंची सुरवात झाली आणि आजच्या तारखेला जवळ जवळ ५०वर्ष भाऊ पत्रकारिता करत आहेत.त्यांच्या कतृत्वाचा अल्पसा घेतलेला थोडक्यात लेखाजोखा
अनेक दैनिके,साप्ताहीके,मासिके यांच्या संपादक,सहाय्यक संपादक पदी आजही भाऊ काम करत आहेत.अक्षर मैफल या नविन मराठी मासिकाचे ही भाऊ सल्लागार संपादक आहेत.आजवर दहा हजारांहून अधिक सामाजिक,राजकीय लेख प्रसिद्ध आहेत.प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील मर्यादा पाहता भाऊंनी त्यांचा ब्लॉग सुरू केला.आजच्या तारखेला जागता पहारा,आणि उलट तपासणी या भाऊंच्या दोन ब्लॉग ची संख्या १३ लाखाहुन अधिक आहे.भाऊ तोरसेकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मार्मिक या मासिकाचे ही संपादक होते.त्यामुळे भाऊंना बाळासाहेब ठाकरे यांचा दिर्घकाळ सहवास लाभला आहे.मराठा व मार्मिक यांच्या संस्कारांमुळे असेल पण आजच्या मराठी पत्रकारितेमध्ये भाऊ तोरसेकर हे नाव परखड पत्रकार म्हणुन प्रसिद्ध आहे.संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासुन भाऊंनी महाराष्ट्र व देशाचे राजकारण डोळसपणे पाहीलेल आहे.आणि इतिहासातील दाखले देत वर्तमान राजकारणाचे विश्लेषण हे भाऊ तोरसेकर यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.प्रदिर्घ राजकारण पाहिलेले भाऊ कोणत्याही पक्षाच्या वागणुकीच्या दुटप्पी पणावर नेमके बोट ठेवु शकतात. ज्याप्रमाणे वकील केस उभी करण्यासाठी उलट तपासणीची पध्दत वापरतो,तशीच भाऊंच्या लेखणीची पध्दत आहे.त्यामुळे इतर पत्रकार पाहु शकत नाहीत ते भाऊ उलगडुन दाखवतात.भाऊ तोरसेकर यांचे लेखन वाचणे हे महाराष्ट्र आणि देशाचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर खुप मोलाचे ठरते.अशा या असमान्य बहुआयामी प्रगल्भ बुध्दीमत्तेच्या,व्यक्तीमत्व असलेल्या भाऊ तोरसेकर यांच्या व्याख्यानाचा प्रत्यक्ष लाभ कडेगांव तालुक्यातील नागरीकांना त्याच बरोबर पत्रकारांना येत्या १८० व्या वर्षाची परंपरा असलेल्याश्री राम मंदीरात रामनवमीच्या माध्यमातून रविवार दि १४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ४ वा. जेष्ठ पत्रकार मा. भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी कडेगांव तालुका पत्रकार संघाचे व कृती समितीच्या सर्व सदस्यांनी व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी यांनी केले आहे. हेमंत व्यास.कडेगांव.
Home ताज्या घडामोडी कडेगांव येथे जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.