कडेगांव पलुस विधानसभा मतदारसंघाचे भाजपा कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या दिमाखात संपन्न

Google search engine
Google search engine

कडेगांव:_ भारतीय जनता पार्टी मुळे माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये विकास कामे करण्याची संधी मिळाली. काम करीत असताना माझ्यााकडून काही चुका झाल्या त्यामध्ये दुरूस्ती करु. भाजपा व मित्रपक्ष एकसंघपणे लढू व यशस्वी होवू असे प्रतिपादन खा. संजय काका पाटील यांनी केले
वांगी ता. कडेगांव येथे भारतीय जनता पार्टीच्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक खा. संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुधीर दादा गाडगीळ, आ. सुरेश भाऊ खाडे, दिपकबाबा शिंदे, मकरंद देशपांडे संजय विभूते, सांगलीच्या महापौर संगीता खोत, लोकसभा संयोजक शेखर इनामदार, मिलींद कोरे, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
खा. संजयकाका पाटील बोलताना पुढे म्हणाले की, गेल्या 5 वर्षात जिल्ह्यामध्ये तीन राष्ट्रीय महामार्ग, टेंभू म्हैसाळ व इतर उपसा जलसिंचनयोजनाची कामे सुरु आहेत. पक्ष व नेतेमंडळीच्यापुढे मी नाही. लोकसभे प्रमाणे विधानसभेलाही एकत्रीत व एकसंघपणे पार्टीच्या आदेशाप्रमाणे काम करु.
स्वागत पलूस तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी केले
यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, सुसंवाद नसल्यामुळे काही अडचणी आल्या होत्या. आमच्या संघर्ष झाला परंतू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे बरोबर सर्वाची एकत्र बैठक झाली व सर्व चर्चा झाल्या व समज गैरसमज दूर झाले. जिल्ह्याच्या गतीमान विकासासाठी एकसंघपणे काम करुन भाजपचा उमेदवार पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवायचा आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

यावेळी आ. सुरेश भाऊ खाडे, आ. सुधीर दादा गाडगीळ राजाराम गरुड यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी जेष्ठ नेते दत्तात्रय सुर्यवंशी, पलूस पंचायत समितीच्या सभापती सिमा मांगलेकर, उपसभापती रविंद्र कांबळे, प. स. सदस्य मंगल क्षिरसागर, जि. प. सदस्य आश्विनी पाटील, शांता कनुंजे, रेश्मा साळुंखे, पपिता सुतार, प्रमोद मिठारी, पांडुरंग जमदाडे, भारत पाटील, धनंजय देशमुख, आनंदराव मोरे, धोंडीराम मोहिते, दाजीराम मोहिते, ब्रिजराज मोहिते, सुर्यकांत बुचडे, श्रीरंग पाटील, गोरख पाटील, हिंदूराव माने, यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार सुरेंद्र चौगुले यांनी मानले.