*….दादाजींचे संस्कार आणि नातवंडांचे कुतूहल

Google search engine
Google search engine

मुलांवर चांगले संस्कार करण्याचे काम कुटुंबातच होत असते . संस्काराला जीवनात अनन्यसाधारण असे महत्व असते.आपल्या कुटुंबतील मुलांवर नातवंडांवरही चांगले संस्कार झाले पाहिजेत असे डॉ.पतंगराव कदम साहेब नेहमी सांगायचे .त्यांनी हे संस्कार आपल्या कुटुंबातही रुजवले आहेत याचे दर्शनच आज त्यांच्या नातवंडांनी सोनसळ येथे दिले.आदरणीय डॉ.पतंगराव कदम साहेब यांचे वर्षश्राद्ध असल्यामुळे अत्यंत भावुक असे वातावरण होते .सोनसळ येथील निवासस्थानी भजन सुरू होते .उपस्थित लोक साहेबांच्या प्रतिमचे दर्शन घेऊन अभिवादन करीत होते .यावेळी साहेबांच्या नातवंडांनी आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या अविर व अभिजय तसेच डॉ.अस्मिताताई जगताप यांच्या राघव या तिन्ही मुलांनी आपल्या लाडक्या दादाजींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि थेट भजनात सहभाग घेऊन टाळ वाजविण्यास सुरवात केली . सुरपेटी वादन शिकण्याचाही या बालकांनी प्रयत्न केला . आम्ही साहेबांचे संस्कार, आचार, विचार, संस्कृती विसरणार नाही असा जणु संदेशच त्यांनी बालवयातच आपल्या कृतीतून दिला.वर्षश्राद्ध असल्यामुळे सर्वांच्या मनात साहेबांच्या आठवणींचा कल्लोळ उठला असताना कदम कुटुंबीय ,नातेवाईक व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळत असताना साहेबांच्या नातवंडांचे मात्र सर्वानाच कुतूहल व कौतुक वाटले आणि हेलावून गेलेली मने क्षणभर प्रफुल्लित झाली.देव भेटेल तुजला आपुल्या घरी !आई वडिलांच्या पावन चरणावरी !!असे भजनी मंडळाच्या सुरात सूर मिसळून गाताना साहेबांची नातवंडेभजनात दंग झालेली दिसत होती.