भाजपा कडेगांव तालुका अध्यक्षपदी युवा नेते धनंजय भौय्या देशमुख यांची निवड

Google search engine
Google search engine

भारतीय जनता पाटीँ कडेगाव तालुका अध्यक्षपदी धनंजय चंद्रसेन देशमुख यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते नुकतेच औदुंबर येथील भारतीय जनता पक्षाच्या सभेत देण्यात आले.
धनंजय देशमुख हे कडेगावातील एक उमदे तरूण युवा नेतृत्व असून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीय कडेगाव तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात तीन पिढयांनी मोठे काम केले आहे.कडेगाव शहरास अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. कडेगावातील भाजपा कार्यकर्त्यांनी त्

सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले.विविध राजकीय व सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
निवडीनंतर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मोठी आहे.जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडू,सामान्य लोकांची कामे तातडीने पार पाडू व पक्षाची ध्येय धोरणे शेवटच्या घटकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करू.सामान्य गोरगरिब जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहू असे शेवटी ते म्हणाले.
यावेळी नामदार चंद्रकांत दादा पाटिल, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश भाऊ खाडे,आमदार शिवाजीराव नाईक,जिल्हा परीषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,राजाराम गरुड,भारतीय जनता पाटीँ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ः कडेगाव तालुका भारतीय जनता पाटीँ अध्यक्ष निवडीचे पत्र धनंजय देशमुख यांना देतांना नामदार चंद्रकांत दादा पाटील, सोबत खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर खाडे,राजाराम गरुड, सभापती रवि तमनगौंडा पाटील, व मान्यवर