वर्धा लोकसभा निवडणुक निरीक्षक नागथ तबस्सुम अब्रू यांनी केली मतदान केंद्राची व स्ट्राँग रूमची केली पाहणी

0
727
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
   वर्धा लोकसभा निवडणुक निरीक्षक नागथ तबस्सुम अब्रू यांनी शुक्रवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील मतदान केंद्राची व स्ट्राँग रूमची पाहणी करून अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
    चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल, नगर परिषद शिवाजी प्राथमिक शाळा, धनोडी, सुपलवाडा या ठिकाणच्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन वर्धा लोकसभा निवडणुक निरीक्षक नागथ तबस्सुम अब्रू यांनी शुक्रवारी मतदान केंद्राचे दरवाजे, खिडक्या, प्रकाश व्यवस्था, रॅम, शौचालय याबाबतची पाहणी केली. यानंतर चांदूर रेल्वे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे असलेल्या स्ट्राँग रूमची सुध्दा पाहणी करून ईव्हीएम मशीनचा अनुक्रमांक, खिडक्यांना विटांच्या भिंतीची केलेली जोडणी व सि. सि. टी. व्ही. कॅमेराचे निरीक्षण केले. तसेच प्रशिक्षण हॉल, साहित्य वाटप व साहित्य स्विकारणे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती देऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक, चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार महादेव जोरवार, धामणगाव रेल्वेचे तहसीलदार भगवान कांबळे आदी उपस्थित होते. चांदूर रेल्वे – धामणगाव विधानसभा मतदार संघात एकुण ३७५ ईव्हीएम मशीन राहणार असुन ७५ मशीन राखीव असणार आहे.