चांदूर रेल्वेत रामदास तडस यांची कार्यकर्त्यांसमवेत बैठक

0
630
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहजाद खान)
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांच्या विजयाकरिता प्रचाराची रूपरेषा ठरविण्याकरिता चांदूर रेल्वे शहर भाजपा आणि शहर व तालुका शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रमोद नागमोते यांचे घरी पार पडली. या बैठकीमध्ये घराघरापर्यंत प्रचाराकरिता विचार करणे, शासनाच्या घराघरापर्यंत सर्व स्कीम सांगणे तसेच त्यांनी या साडेचार वर्षात केलेले कामे लोकांना सांगणे प्रचार करणे, मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करणे, प्रत्येक कार्यकर्त्याने दररोज २५ मतदारांना वैयक्तिकरित्या भेटी देणे, पक्षाच्यावतीने येणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखून त्याचे नियोजन करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुषमाताई खंडार या होत्या. बैठकीमध्ये भाजपाचे बंडू भुते, बबनराव गावंडे, अजय हजारे, प्रमोद नागमोते, डॉ. वसंतराव खंडार तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमुख रवि दिक्षीत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सौ.सुरेखा विलास तांडेकर, अपर्णा जगताप, गजाननराव यादव , शिवसेनेचे राजेश पांडे, गजानन यादव, मनोज मालपे, भाजपाचे प्रशांत कातोरे ,मधु गहूकार, लोकेश माकोडे सह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या सभेमध्ये रामदास तडस यांना भरपूर मतांनी निवडून आणण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला .
या दरम्यान दत्ता धामणकर ,संदीप लोया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सभेचे संचालन माजी नगरसेवक हिम्मत डोणेकर तसेच आभार प्रदर्शन भाजपाचे शहर सरचिटणीस हरिष वऱ्हाडे यांनी केले. यावेळी दिनेश खोब्रागडे, विनोद खोब्रागडे, अरुण हरसुले , विनोद मोडळे, अविनाश गावंडे, सुभाष मते, बंडू गावंडे, राजेश पांडे, गजानन चौधरी, संदीप मेश्राम, सुनील आकोटकर, संजय शिखरे, साहेबराव शिंदे, साहेबराव निस्ताने, अमर ठवकर , दीपक खरुले संतोष बद्रे यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते