अवैध वाळू तस्करी करून शासनाचा लाखोचा महसूल चोरी

0
1016
Google search engine
Google search engine

शेगांव:- बुलढाणा आणि अकोला दोन जिल्ह्यांना जोडणारा नागझरी कसुरा येथील पूर्णा नदीवरच्या पात्रात अवैध प्रकारे रेतीची तस्करी होताना दिसत आहे, इतकेच नव्हे तर हे वाळू तस्कर या नदीपात्रातून कित्येक ट्राली ट्रक भरून अवैध प्रकारे जागोजागी तिची साठवण केलेली दिसते परंतु शेगाव आणि बाळापुर तहसीलदार यांच्या नावाने अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या वाळू चोरीच्या बातम्या आपन वाचल्या असतिल ,
कि अमुक गावच्या तहसिल दारने वाळुने भरलेलेले वाहन धरून त्यांना दंडित केले आणि शासणाच्या महसुलात भर टाकली ,पण हे असे दृष्य पाहल्यानंतर अस वाटते भर टाकली कि भार टाकला ,
पण काय या बातम्या फक्त वरील अधिकारी जनता शासन यांच्या डोळ्यात धूळ टाकण्यासारखी वाटत नाही कारण इतकेच जर हे अधिकारी कर्तव्यदक्ष आहेत तर यांच्या डोळ्याखाली हा एवढा मोठा रेतीचा साठा कसा, लपवलेला दिसून येतो.
हा खूप मोठा प्रश्न आहे ,एवढेच बोलून संपत नाही तर काय या वाळूतस्करांनी शासनाचा किती मोठा महसूल चोरी केला असेल, हेही समजणे महत्त्वाचे आहे यात कोणते अधिकारी दोषी आहेत आणि कोणते अधिकारी ठेकेदारांकडून, वाळू तस्करांकडून मलाई खाऊन शांत बसलेले आहेत हे ही शोधणे जरुरी आहे. कारण आम्ही ज्या अधिकाऱ्यांना आमच्या म्हणजेच देशाच्या महसुलाची रक्षणाची जबाबदारी दिलेली आहे ते जर का योग्य प्रकारे आपले कार्य करत नसतील तर त्यांना एवढा मोठा पगार देऊन उपयोग काय,
सांगायचं एवढंच की ही तस्करी जर का तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना दिसते ,नजरेस येते , तर ज्यांचे हे काम आहे त्यांना का दिसत नाही,
की ते मुद्दाम या गोष्टींकडे लक्ष देत नाही येथे हे जरुर म्हणावे लागते पीठ कोण दळतंय आणि कोण खातंय .
2019 च्या लोकतंत्र चा महोत्सव सुरू झाला आहे आणि येत्या 18 तारखेला आपल्याला योग्य प्रतिनिधी निवडून संसद म्हणजेच लोकतंत्रच्या मंदिरात पाठवणे आहे म्हणून त्यादिवशी स्वयंस्फूर्तीने जनतेने मतदान करावे जेणेकरून आपल्या या संपत्तीचा असे चोर, तस्कर, तस्करी करणार नाही ,आणि आपला देश समृद्ध व सुखी होईल.