चांदूर रेल्वे – अमरावती मार्गावर ट्रकची ऑटो रिक्षाला धडक सुदैवानी कोणीही जखमी नाही

0
743
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर मांजरखेड जवळ ट्रक आणि प्रवासी ऑटोरिक्षाचा रविवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान अपघात झाला. रस्त्यावर ट्रक वळत असताना रिक्षाचालकाला अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली. या अपघातामध्ये सुदैवाने रिक्षातील ९ प्रवासी थोडक्यात बचावले.
चांदूर रेल्वेमार्गे अमरावती ते धामणगाव रेल्वे पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे रस्ता चौपदरीकरणाचे काम मांजरखेड लगत सुरू आहे. याठिकाणी माल वाहून नेण्यासाठी ट्रक आहेत. मुख्य रस्त्यावरून ट्रक कामाच्या ठिकाणी वळवत असतांना मांजरखेड ते चांदूर रेल्वे मार्गावर मांजरखेड जवळ हा अपघात घडला. ट्रक वळवत असताना चालकाने रिक्षाचालकाला हात दाखवून थांबण्याची विनंती केली. पंरतु, अंदाज न आल्याने रिक्षा ट्रकला धडकला. त्यानंतर रिक्षा जवळील झाडाला जाऊन धडकले. रिक्षामध्ये ९ प्रवासी होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही व ऑटोचे सुध्दा जास्त नुकसान झाले नाही. त्यामुळे प्रकरण तेथेच निपटुन पोलीस तक्रार झाली नाही.